गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा आयोजित न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफणार श्री. देवाजी तोफा - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा आयोजित न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफणार श्री. देवाजी तोफा

दि. २६ डिसेंबर २०२२

Vidarbha News India - VNI

गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा आयोजित न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफणार श्री. देवाजी तोफा

गडचिरोली : गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी स्मृती व्याख्यानमालेमध्ये मागीलवर्षी डॉ. अभय बंग यांनी प्रथम पुष्प गुंफले होते.

यावेळी श्री. देवाजी तोफा हे दुसरे पुष्प गुंफणार आहेत. 'सर्व सहमति से ग्राम स्वराज की ओर' याविषयावर ते संवाद साधतील. अवघ्या 500 लोकवस्ती असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा-लेखा गावाचा रौचक इतिहासासह परिवर्तनाची प्रेरक कहाणी काही महत्त्वाच्या आठवणींचे क्षण उलगडणार आहेत.

जैन हिल्समधील गांधी तिर्थ येथील कस्तूरबा सभागृहामध्ये दि. २७ डिसेंबर ला संध्याकाळी ४ वाजेला श्री. देवाजी तोफा व्याख्यानात मार्गदर्शन करतील. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन आयंगार, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची असेल. वरिष्ठ गांधीयन न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यात तत्वनिष्ठता, सज्जनता आणि विवेकशीलता यांचा संगम होता. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी कार्य केले आणि सर्वोदय समाज घडविण्यासाठी दिशा दिली. त्यांच्या सन्मानार्थ २०२१ पासून गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे व्याख्यानमाला आयोजित केली जात आहे. मागील वर्षी डॉ. अभय बंग यांनी मार्गदर्शन केले तर यावर्षी श्री. देवाजी तोफा दुसरे पुष्प गुंफतील. वन अधिकार कानून - २००६ नुसार २००९ मध्ये सामुहिक वन अधिकार पत्र प्राप्त करणारे गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा-लेखा ही ग्रामसभा देशातील पहिली ठरली होती. यावेळी 'दिल्ली, मुंबई हमारी सरकार, हमारे गाव में हम ही सरकार' याचा बुलंद आवाज सार्थक करणारे मेंढा-लेखा गावाचे नायक श्री. देवाजी तोफा हे 'सर्व सहमति से ग्राम स्वराज की ओर' या विषयावर संवाद साधणार आहे. यावेळी मेंढा-लेखा गावात झालेल्या परिवर्तनिय बदलांविषयीची रोचक माहिती न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या स्मृति व्याख्यानाप्रसंगी उपस्थितांना श्री. देवाजी तोफा अवगत करतील. 

ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामसभा व ग्रामपंचायत यांचे अधिकार, कर्तव्य,जबाबदाऱ्यांविषयी  ते अवगत करतील. 


Share News

copylock

Post Top Ad

-->