दि. ०५/१२/२०२२
गोंडवाना विद्यापीठात 'आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान' या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने 'आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान ' या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम ६ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता, गोंडवाना विद्यापीठ सभागृहात कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, यांच्या अध्यक्षतेत आयोजीत करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात डॉ. अनिल शिंगरे, सहयोगी प्राध्यापक, संत जनाबाई महाविद्यालय, गंगाखेड, परभणी यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लाभणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी केले आहे.