सकाळच्या वर्कआउटमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो; कधी आणि कसा व्यायाम कराल? येथे वाचा - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

सकाळच्या वर्कआउटमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो; कधी आणि कसा व्यायाम कराल? येथे वाचा

दि. ०९ डिसेंबर २०२२

Vidarbha News India - VNI

Health Tips : सकाळच्या वर्कआउटमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो; कधी आणि कसा व्यायाम कराल? येथे वाचा

विदर्भ न्यूज इंडिया

Health Tips : 

आजकाल शरीराला फिट ठेवण्यासाठी वर्कआउट खूप महत्त्वाचा मानला जातो. वर्कआऊट तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता. पण, सकाळचा वर्कआउट हा आरोग्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.

सकाळच्या व्यायामाचे अनेक फायदे आहेत. व्यायाम केल्याने अनेक प्रकारचे धोकादायक आजार टाळता येतात. सकाळच्या वर्कआउटचे काय फायदे होऊ शकतात ते जाणून घ्या.

सकाळच्या व्यायामाचे फायदे कोणतेdi?

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधन अहवालानुसार, सकाळचे वर्कआउट करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका कमी असतो. युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीने नुकतेच एक संशोधन प्रकाशित केले आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की, सकाळी वर्कआउट करणाऱ्या लोकांच्या हृदयाशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. तसेच, सकाळच्या वर्कआउटऐवजी इतर वेळी वर्कआउट करणार्‍या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका अधिक दिसून आला आहे.

योग्य व्यायामाची वेळ कोणती ?

आरोग्य तज्ञांच्या मते, सकाळीच वर्कआउट करणे चांगले मानले जाते. सकाळी व्यायाम किंवा वर्कआउट करणाऱ्या लोकांच्या तब्येतीत चांगली सुधारणा दिसून आली आहे. व्यायामाचा महिला आणि पुरुषांवर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. वर्कआऊट केल्याने स्त्रिया पुरुषांपेक्षा वेगाने वजन कमी करू शकतात. असेही संशोधनात दिसून आले आहे.

सर्वोत्तम सकाळचा व्यायाम

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी शरीर अधिक सक्रिय आणि ताजेतवाने राहते. त्यामुळे सकाळची वेळ वर्कआऊटसाठी चांगली असते. दिवसा किंवा रात्री इतर कोणत्याही वेळी वर्कआउट केल्याने दैनंदिन दिनचर्या किंवा झोपेची पद्धत देखील बदलू शकते. जी आरोग्यासाठी धोकादायक देखील असू शकते.

'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • तुमच्या दिवसाची सुरुवात काही शारीरिक हालचालींनी करा.
  • जर वर्कआउट करण्याचा कंटाळा येत असेल तर थोडा वेळ वॉकिंग करा.
  • लिफ्टच्या ऐवजी जिन्याने ये-जा करा.
  • घरच्या घरी तुम्ही स्किपिंग देखील करू शकता.

टीप : वरील सर्व बाबी विदर्भ न्यूज इंडिया केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून #MediaVNI मीडिया वी. एन. आय. कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Share News

copylock

Post Top Ad

-->