शेत मशागतीचे काम करताना ट्रॅक्टर राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू ..! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

शेत मशागतीचे काम करताना ट्रॅक्टर राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू ..!

दि. ०५/१२/२०२२ 

Vidarbha News India - VNI
शेत मशागतीचे काम करताना ट्रॅक्टर राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू ..!

विदर्भ न्यूज इंडिया 

(गडचिरोली) आरमोरी : पीक लागवडीसाठी ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची ही घटना आरमाेरी तालुक्यातील वडधानजीकच्या एका शेतात रविवारी (दि. ४) सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत युवकाचे शीर धडावेगळे झाले.

अंकुश रामभाऊ दाेडके (२९, रा. देलाेडा खुर्द) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. अंकुश दाेडके हा वडधा येथील राजेंद्र ठाकूर यांच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत हाेता. नेहमीप्रमाणे ताे रविवारी ट्रॅक्टर चालविण्यासाठी गेला हाेता. रविवारी वडधा-खरपी मार्गावरील नाल्यालगत असलेल्या परसराम सयाम यांच्या शेतात ट्रॅक्टरला राेटावेटर जाेडून मशागतीचे काम सुरू हाेते. दरम्यान, सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास अपघात घडला. अपघातात अंकुशचा चेंदामेंदा हाेऊन शीर धडावेगळे झाले. एक पायसुद्धा तुटला. विशेष म्हणजे, एका बांधित मृतकाचे प्रेत हाेते, तर दुसऱ्या बांधित ट्रॅक्टर उभे हाेते. त्यामुळे अपघात नेमका कसा घडला याबाबत अनेक शंका आहेत.

ट्रॅक्टर चालविणारा काेण?

परसराम सयाम यांच्या शेतात पीक लागवडीसाठी मशागत करताना अंकुश हा ट्रॅक्टर चालवित हाेता, की अन्य काेण वाहन चालवित हाेते? अंकुश जर ट्रॅक्टर चालवित हाेता तर ताे मागील बाजूला कसा पडला? दुसरा व्यक्ती वाहन चालवित तर नसावा ना? व अंकुश हा ट्रॅक्टरच्या मधील टायरच्या मडगार्ड कव्हरवर बसला तर नसावा ना, असे अनेक प्रश्न उपस्थित हाेत आहेत.

Share News

copylock

Post Top Ad

-->