विधानभवनावर मजदूर युनियनतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चाला चांगला प्रतिसाद
संघटनेस ऊर्जा सचिव व तिन्ही वीज कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे पातळीवर चर्चेसाठी पाचारण
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर : विधानभवनावर मजदूर युनियनतर्फे काल काढण्यात आलेल्या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला.
काल दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर स्वतंत्र मजदूर युनियन व मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे अतिविशाल असा मोर्चा धडकला, जो आजपर्यंतंचे सर्व उच्चांक तोडणारा ठरला. वीज कंपन्यांच्या प्रस्तावित खाजगीकरणास विरोध व अडानी समुहास नवी मुंबई, ठाणे, भांडूप, पनवेल व इतर वितरण विभाग समांतर अनुज्ञप्तिच्या माध्यमातून देऊ नये ही या मोर्चाची प्रमुख मागणी होती. या मोर्चाची भव्यता इतकी होती की एक टोक माॅरीस काॅलेज टी पाइंट तर दुसरे टोक हे होते. या मोर्चाच्या प्रभावाने सरकारची सुत्रे हलली आणि आज २२ डिसेंबर रोजी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेस ऊर्जा सचिव यांचे पातळीवर चर्चेसाठी दुपारी ४ वाजता पाचारण करण्यात आले.
हक्क हे फक्त लढून... आणि लढूनच मिळतात! या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर मार्गक्रमण करणाऱ्या स्वतंत्र मजदूर युनियन व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा संघर्ष निश्चितपणे यशप्राप्तीकडे वाटचाल करेल.
- एन. बी. जारोंडे