गडचिरोली येथील लाचखोर पोलीस हवालदार अडकला ACB एसीबीच्या जाळ्यात - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली येथील लाचखोर पोलीस हवालदार अडकला ACB एसीबीच्या जाळ्यात

दि. ०३/१२/२०२२
Vidarbha News India - VNI

गडचिरोली येथील लाचखोर पोलीस हवालदार अडकला ACB एसीबीच्या जाळ्यात

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली : येथील पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात जमानत देण्यासाठी तीन हजार पाचशे रुपयांची लाच मागणारा पोलिस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. शकील बाबु सय्यद असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. विशेष म्हणजे सदर कारवाई गडचिरोली येथील ला.प्र.वि. ने ०३ डिसेंबर २०२२ रोजी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे केली.
प्राप्त माहितीनुसार शकील बाबु सय्यद (वय ५० ) असे अटक करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रारदाराच्या आतेभावास अटक करुन पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. दाखल असलेल्या गुन्ह्यात सहकार्य करून जेलमध्ये न पाठविण्याचे व त्यांस जमानत मिळवून देण्याकरीता ३ हजार ५०० रुपये लाच रक्कमेची पंचसाक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी केली.

सदर तक्रारीची शहानिशा करून सापळा कारवाई केले असता लाचखोर कर्मचारी सदरची रक्कम पोस्टे गडचिरोली येथील तपास कक्षेत स्विकारलेवरुन गडचिरोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. 
सदरची कारवाई पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड यांच्या पर्यवेक्षणात पो. नि श्रीधर भोसले, सफौ प्रमोद ढोरे, नापोशि राजु पदमगिरीवार, श्रीनिवास संगोजी, पोशि किशोर ठाकुर, संदिप उडाण, संदिप घोरमोडे, मपोशि विद्या म्हशाखेत्री व चापोहवा तुळशिराम नवघरे सर्व ला.प्र. विभाग गडचिरोली यांनी केली. 

Share News

copylock

Post Top Ad

-->