घोट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा
ता. प्रतिनिधी चामोर्शी : दिलीप खोब्रागडे
घोट : सर्कल कमिटीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक घोट येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर उपस्थित घोट ग्रामपंचायत चे सरपंच रूपाली दुधबावरे, उपसरपंच विनय बारसागडे, पोलीस मदत केंद्र घोट सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. रोंडे साहेब, पोलीस उपनिरीक्षक काळे सर, पोलीस उपनिरीक्षक श्रीमंगल सर, पत्रकार दिलीप खोब्रागडे यांची उपस्थिती होती.
मा. रोंडे साहेब यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला सर्कल कमिटी घोट चे सदस्य, कवडू कुकुडकर, प्रकाश चुणारकर , दिनकर लाकडे , विलास वनकर, किशोर खोब्रागडे, हिवराज फुलजले, संजय वाकडे, तसेच गावातील व घोट सर्कल मधील नागरिक उपस्थित होते.