तीन दिवसीय अमृत क्रीडा व कला महोत्सवात ३५० च्या वर कर्मचाऱ्यांचा सहभाग - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

तीन दिवसीय अमृत क्रीडा व कला महोत्सवात ३५० च्या वर कर्मचाऱ्यांचा सहभाग

दि. ३० जानेवारी २०२३


तीन दिवसीय अमृत क्रीडा व कला महोत्सवात ३५० च्या वर कर्मचाऱ्यांचा सहभाग

- उत्साह पूर्ण वातावरणात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न
क्रिकेटचा विजेता संघ गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली
समुह नृत्यातील स्वरसाज विजेता संघ गोडवाना विद्यापीठ गडचिरोली

विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण तसेच विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी तसेच संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील ३५० शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी २७ ते २९ जानेवारी अशा तिन दिवसिय गोंडवाना विद्यापीठ परिसरात अमृत क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक २९ जानेवारी ला या महोत्सवाचा बक्षिस वितरण समारंभ पार पडला. 
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे,विशेष अतिथी म्हणून नागपूर येथिल आंतरराष्ट्रीय ख्याती चे रॉकस्टार  डॉ. केदार सिंग सी.रोटेले(केड्राक)नागपूर,
प्रमुख अतिथी म्हणून बोधी फाउंडेशन नागपूरचे ललित खोब्रागडे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, जिल्हा क्रीडा अधिकारी  प्रशांत दोंदल, कबड्डीपटू यवतमाळ लक्ष्मण मोतीराम पवार , विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र देव, मानव विज्ञान अधिष्ठाता डॉ.चंद्रमाऊली,  संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग डॉ. अनिता लोखंडे,संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. विजय सिल्लारे ,  सचिव तथा अधिसभा सदस्य, सतीश पडोळे, विजयकुमार घरत अधिसभा सदस्य, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोहर जाधव, आणि प्रशांत रंदई, महासचिव अरूण जुनघरे आदी मंचावर उपस्थित होते.
बोधी फाउंडेशन नागपूरचे सचिव ललित खोब्रागडे म्हणाले, वैरागड हे माझं जन्मगाव आहे. त्यामुळे येथील नागरिकांशी मला जिव्हाळा आहे.येथील लोकांच्या कला, कौशल्याला वाव देण्यासाठी कार्य करणार असल्याचे ते म्हणाले.
केड्राक  सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष तसेच आंतरराष्ट्रीय  रॉकस्टार केदारसिंग रोटेले म्हणाले, दोनशेहुन अधिक देशांमध्ये आमची केड्राक संस्था काम करते आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचा कलेला वाव देण्यासाठी एक सेंटर इथे तयार करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
अध्यक्ष स्थानावरून बोलतांना गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे म्हणाले,या स्पर्धा नव्हत्या तर उत्सव आहे. प्रत्येकाच्या अंगी एक तरी कला असतेच या  कलेला वाव देण्यासाठी हा अमृत क्रीडा व कला उत्सव होता.
याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल आणि कबड्डीपटु लक्ष्मण पवार यांनीही आपले मनोगत केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिता लोखंडे , संचालन मनिषा फुलकर तर आभार  कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन यांनी मानले. या कार्यक्रमाला  सहभागी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी जिल्हा क्रीडा अधिकारी मदन टापरे आणि गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

स्पर्धेतील विजेते :

क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांक गोंडवाना विद्यापीठ, उपविजेता संघ जनता महाविद्यालय चंद्रपूर ,उत्कृष्ट खेळाडू विजय वंजारी गोंडवाना विद्यापीठ, पुरुषांच्या व्हालीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक महात्मा गांधी महाविद्यालय गडचांदूर, निळकंठराव शिंदे महाविद्यालय भद्रावती, गुरुकुल महाविद्यालय नांदा फाटा, विदर्भ महाविद्यालय जिवती,  व्दितीय  क्रमांक गोंडवाना विद्यापीठ,सर्वोत्तम लिफ्टर प्रविण पहानपटे, पुरुषांच्या दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रफुल्ल थुटे, आनंदनिकेतन महाविद्यालय वरोरा, द्वितीय योगेश सोपनकर, गोंडवाना विद्यापीठ, तृतीय सतीश मुनघाटे ,गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय कुरखेडा, महिलांमध्ये माधुरी पोत्रजवार  द्वितीय गंगा राठोड  ,तृतीय अमिता बोलगोडवार गोंडवाना विद्यापीठ , पुरुषांच्या खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक आनंदनिकेतन महाविद्यालय वरोरा, द्वितीय ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव ,उत्कृष्ट खेळाडू भूषण सूर्यवंशी, आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा, महिलांमध्ये प्रथम गोंडवाना विद्यापीठ , द्वितीय मोहसिनभाई जव्हेरी महाविद्यालय वडसा, नेवजाबाई हितकरणी महाविद्यालय ब्रह्मपुरी, आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा, विदर्भ महाविद्यालय जिवती, उत्कृष्ट खेळाडू म्हणून मनीषा गावडे गोंडवाना विद्यापीठ पुरुषांच्या रस्साखेच स्पर्धेत प्रथम गोंडवाना विद्यापीठ , व्दितीय आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा ,महिलांमध्ये प्रथम गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वितीय मोहसिनभाई जव्हेरी महाविद्यालय वडसा, नेवजाबाई महाविद्यालय ब्रह्मपुरी, आनंदनिकेतन महाविद्यालय वरोरा, विदर्भ महाविद्यालय जीवती,
संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक हिना पांडे आनंदनिकेतन महाविद्यालय वरोरा ,द्वितीय माधुरी पोत्रजवार, तृतीय मनीषा गावडे गोंडवाना विद्यापीठ पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा, द्वितीय महात्मा गांधी महाविद्यालय गडचांदुर, बेस्ट रायडर प्रफुल्ल थुटे, आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा,सर्वोत्तम कॅचर शुभकांत शेरकी, महात्मा महाविद्यालय 
कला प्रकारात एकल गीत गायन अमृत अमित अमृतकर एसआरएम समाजकार्य महाविद्यालय चंद्रपूर ,द्वितीय डॉ. संदेश सोनुले गोंडवाना विद्यापीठ आणि हिना पांडे आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा,
समुह गित गायन स्वरसाज संग गोंडवाना विद्यापीठ, कालिंदी देशमाने व संच आनंदनिकेतन महाविद्यालय वरोरा, एकल नृत्य हिना पांडे,आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा, द्वितीय गंगा राठोड ,गोंडवाना विद्यापीठ,समुह नृत्य स्वरसाज संघ,व्दितीय  मनीषा फुलकर व संच गोंडवाना विद्यापीठ, एकपात्री नाटिका प्रथम डॉ. संदेश सोनुले,  द्वितीय संतोष नैताम गोंडवाना विद्यापीठ, लघुनाटिका आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा, द्वितीय ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव
अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात सर्व खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडवले.



Share News

copylock

Post Top Ad

-->