गोंडवाना विद्यापीठातील नामकरण प्रकरण आणखी तापणार, आदिवासी कार्यकर्ते वसंंतराव कुलसंगे यांचे बेमुदत उपोषण सुरू - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गोंडवाना विद्यापीठातील नामकरण प्रकरण आणखी तापणार, आदिवासी कार्यकर्ते वसंंतराव कुलसंगे यांचे बेमुदत उपोषण सुरू

दि.२७ जानेवारी २०२३

Vidarbha News India - VNI

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील नामकरण प्रकरण आणखी तापणार, आदिवासी कार्यकर्ते वसंंतराव कुलसंगे यांचे बेमुदत उपोषण सुरू

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील सभागृहाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक सदस्य स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्याचा ठराव रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी प्रसिद्ध आदिवासी कार्यकर्ते आणि वीर बाबुराव आदिवासी विकास प्रबोधन समितीचे संस्थापक अध्यक्ष वसंत कुलसंगे विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ उपोषणाला बसले आहेत.

वसंत कुलसंगे हे एक निष्ठावंत ज्येष्ठ आदिवासी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात आणि गेल्या अनेक वर्षांपासून वीर बाबुराव शेडमाके यांच्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा प्रसार करण्यात ते सक्रिय आहेत. कुलसंगे यांनी विद्यापीठाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, विद्यापीठाच्या अधिसभेने आदिवासी क्रांतिकारक, जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांकडे दुर्लक्ष करून सभागृहाला दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर केला. हा जिल्ह्यातील जनतेचा अपमान आहे. हा ठराव तात्काळ रद्द करून सभागृहाला शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्यात यावे. यासाठी त्यांनी २६ जानेवारीपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. सोबतच त्यांना विविध संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याने नामकरण प्रकरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.


Share News

copylock

Post Top Ad

-->