कर्तृत्ववान महिला : जिजाऊंची दूरदृष्टी...
विदर्भ न्यूज इंडिया
ध्येयवादी,कर्तृत्ववान होती
लखुजी जाधवांची ही पोर,
धैर्याने शिवबाला घडविले
मुत्सद्दीपणे देवून उत्तम संस्कार..
कर्तृत्ववान महिला दूरदृष्टी अगाध
केले शिवरायाला कणखर तयार,
दीनांची माऊली सहावेना बघून
रयतेवर होणारा अत्याचार..
सह्यांद्री,शिवनेरीच्या कुशीत
युगपुरुष शिवबास जन्म दिला,
स्वराज्याची स्वंप्ने साकारण्यासाठी
राजमाता जिजाऊंनी इतिहास रचला..
इतिहासाचे बाळकडू पाजून
स्वराज्याचे स्वप्नं रेखिले,
शिवबांच्या आद्यगुरू जिजाऊने
न्याय,निवाड्याचे धडे शिकविले..
संकल्पनेचे बीज मनी पेरून
गोर-गरिबांची झाली सावली,
हिंदवी स्वराज्याची करून स्थापना
कीर्ती जगभरात मिळवली..
प्रियंका वाकडे- शेंडे
(गडचिरोली)
मो :- 94049 59523