नागरिकांनी लोकशाही मुल्य अंगीकारून विकास निवडला : जिल्हाधिकारी संजय मीणा - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

नागरिकांनी लोकशाही मुल्य अंगीकारून विकास निवडला : जिल्हाधिकारी संजय मीणा

दि. 27 जानेवारी 2023

Vidarbha News India - VNI

नागरिकांनी लोकशाही मुल्य अंगीकारून विकास निवडला : जिल्हाधिकारी संजय मीणा 

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली : आजपर्यंत जिल्ह्यात दुर्गम भाग democratic values जास्त असल्याने विकासात्मक कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. परंतू आता परिस्थिती बदलत आहे, नक्षली विचारधारांना आता जिल्ह्यातून हद्दपार केले जात आहे.

दुर्गम भागातील नागरिकांनी लोकशाही मुल्यांना आणि शासनाला अंगीकारले आहे. सर्वांना आता विकास हवा आहे. प्रशासन, पोलिस दल यांना विविध योजनांच्या सहाय्याने लोकशाही मुल्य रूजविण्यास यश मिळाले आहे. नक्षल विचारधारा नेहमीच विकासापासून दूर असते. आता प्रत्येकालाच विकास हवा असून कौटुंबिक अर्थचक्राला गती देणारी व्यवस्था हवी आहे. यासाठी प्रशासन सर्वसामान्य नागरिकांच्या सोबत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले.

पोलिस मुख्यालयातील कवायत democratic values मैदानावर 73 व्या प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हावासियांना उद्देशून ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सहायक जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष, सहायक जिल्हाधिकारी राहूल मीणा, अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, democratic values आता नागरिक विविध शासकीय योजना स्विकारून विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. रोजगार निर्मितीसाठी जिल्हा प्रशासन वनोपज, नरेगा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, आधुनिक शेती, शिक्षण, दळणवळणासाठी रस्ते आणि आरोग्य सुविधांमधून पाठबळ देत आहे. जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात वाढ होत असून शासनाकडून खनिज प्रक्रिया उद्योग येत्या काळात सुरू केले जाणार आहेत. कौशल्य वृद्धीसाठी एकल केंद्र, अल्फा अ‍ॅकादमी, टाटाचे केंद्र उभारून रोजगार निर्मितीसाठी युवकांच्या क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातच रोजगाराबाबत प्रशिक्षण व रोजगारासाठी आवश्यक मनुष्यबळ निर्माण करणे हा प्रशासनाचा मुख्य हेतू आहे असे म्हणत त्यांनी सर्व जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यानंतर मीणा यांनी परेड निरीक्षण केले. विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्यांचा गौरव त्यांच्या हस्ते करण्यात आला. यात नुकतेच पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले जिल्ह्यातील जेष्ठ नाट्य कलावंत परशुराम खुणे यांचा गौरव जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला. पोलिस विभागातील पोलिस निरीक्षक विठ्ठल मनोहर मुत्यमवार यांनी पोलिस दलात 36 वर्षे 7 महिने उत्कृष्ठ सेवा बजावल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पदक मिळाल्याबद्दल सुहास ईलमलवार, ओमकांत पवार, धनराज पोरेड्डीवार, अमित सिंग, संदिप बुरांडे, रुपाली काळे, शाखा अभियंता यांना पोलिस मुख्यालय व इतर पोलिस विभागाची कामे केल्याबद्दल प्रशंसनीय पत्र देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच आरोग्य विभागात उल्लेखनिय कामगिरी बजावणार्‍या जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधु आर्थोपेडिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर या रुग्णालयांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कृषि विभागात उल्लेखनिय कामगिरीकरीता संदिप कर्‍हाळे, शितल खोबरागडे, सुनिल बुद्धे, सुरेश आत्राम, अभिजित वाघमारे, निलू पेंदाम, कोमलसींग यांचा सन्मान केला. क्रिडा विभागात सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी मदन टापरे यांचा सन्मान केला. महाराष्ट्र राज्य ऑलिंपिंक क्रीडा स्पर्धा 2022-23 करीता रोशन नारायणराव साळंके यांना धनुर्विद्या या खेळात सुवर्ण पदक, मनस्वी राजु बामनकर यांना धनुर्विद्या या खेळात कांस्य पदक, यशश्री चंद्रकांत साखरे यांना बॉक्सिंग या खेळात रौप्य पदक, सेजल किशोर गद्देवार यांना वुशु या खेळात सुवर्ण पदक, गौरव हिचामी यास वुशु या खेळात रौप्य पदक, मोनिका शामराव सडमेक यास 32 व्या सब ज्युनियर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत विदर्भाचे प्रतिनिधीत्व केल्यामूळे सन्मानित करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमात गडचिरोली येथील भगवंतराव हिंदी हायस्कुल, वसंत विद्यालय, प्लॅटिनम ज्युबली हायस्कुल, शिवकृपा महाविद्यालय, कार्मेल हायस्कुल यांनी सहभाग नोंदविला.

Share News

copylock

Post Top Ad

-->