दि. १३ जानेवारी २०२३
Vidarbha News India - VNI
शिर्डीला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, 10 साईभक्तांचा मृत्यू, अनेकजण जखमी..!
नाशिकमधील सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघाताची दुर्घटना घडलीय. या अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू, तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
विदर्भ न्यूज इंडिया
खासगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन ही अपघाताची दुर्घटना घडली. आज (13 जानेवारी 2023) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
सिन्नर-शिर्डी महामार्गावरील वावी पाथरे गावाजवळ हा अपघात झाला.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधून 15 बस साईबाबांच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. अपघातग्रस्त बस ही त्यातलीच एक बस आहे.अपघातग्रस्त बसमध्ये ठाण्यातील अंबरनाथमधील 50 भाविक होते. या बसला अपघात झाल्यानंतर त्याली 10 जणांचा मृत्यू, तर उर्वरीत प्रवासी गंभीर जखमी झाले.
अपघाताच्या चौकशीचे दिले निर्देश
नाशिक शिर्डी महामार्गावर वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.नाशिक शिर्डी महामार्गावर झालेल्या खासगी बसचा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आले असून जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार देण्यात येणार आहेत. तसेच या अपघाताच्या चौकशीचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
Twitter update
या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली.
जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत, तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले