राज्यातून थंडी गायब, उन्हाचा कडाका अचानक वाढणार, धुक्यामुळे पिकांचे नुकसान - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

राज्यातून थंडी गायब, उन्हाचा कडाका अचानक वाढणार, धुक्यामुळे पिकांचे नुकसान

दि. 21 जानेवारी 2023

Vidarbha News India - VNI

weather update maharashtra news : राज्यातून थंडी गायब, उन्हाचा कडाका अचानक वाढणार, धुक्यामुळे पिकांचे नुकसान

विदर्भ न्यूज इंडिया

मुंबई : राज्यात जळगाव, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडी तशीच राहिली असली तरी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मात्र गारवा कमी झाला आहे. दरम्यान आज (ता.21) उत्तर महाराष्ट्रात सोडून काही जिल्ह्यात थंडी तिव्रता कमी होणार आहे. यामुळे काही अंशी अनेक जिल्ह्यांना थंडीपासून दिलासा मिळणार आहे. तर विदर्भ, कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्याच्या उर्वरित भागात बहुतांशी ठिकाणी तापमान 14 अंशांच्या वर गेल्याने गारठा कमी झाला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी धुके पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान धुक्यामुळे दिवसभरात उन्हाच्या झळा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उन्हाचा चटका वाढल्याने राज्याच्या कमाल तापमानातही वाढ होत झाली आहे.

बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 30 ते 35 अंशांच्या आसपास आहे. यवतमाळ येथे राज्यातील उच्चांकी 34 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. काल शुक्रवारी (दि. 20) उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या नीचांकी 3.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (दि. 21) ओडिशा, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा राज्यांच्या काही भागात दाट धुके पडण्याचा अंदाज आहे.

दरम्यान मागच्या 24 तासांत पुणे 32.1 (12.0), जळगाव 30.5 (15.0), धुळे 30.0 (11.6), कोल्हापूर 30.8 (17.3), महाबळेश्वर 28.1 (14.1), नाशिक 31.8 (11.0), निफाड 30.6 (9.1), सांगली 31.5 (16.8), सातारा 31.7 (13.0), सोलापूर 33.7 (18.2), रत्नागिरी 32.2 (17.7), औरंगाबाद 31.4 (11.6), नांदेड 31.8 (16.2), परभणी 31.1 (17.7),

अकोला 33.3 (16.4), अमरावती 30.4 (15.1), बुलढाणा (17.0), चंद्रपूर 29.8 (17.7), गडचिरोली 31.2(15.2), गोंदिया 29.2(14.2), नागपूर 30.0 (15.5), वर्धा 31.2(16.4), वाशीम 32.2 (15.4), यवतमाळ 34.0 (19.0) तापमानाची नोंद झाली.

मुंबईची हवा खराब

मुंबईत मागच्या चार दिवसांपासून हवेची गुणवत्ता खराब होत आहे. मागच्या चार दिवसांत सर्वात खराब हवा 324 अशी नोंदवण्यात आली आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत 336 अशी नोंदवण्यात आली आहे. दरम्यान दिल्ली आणि मुंबईत काही आकड्यांचा फरक राहिला आहे. यामुळे भविष्या मुंबई दिल्लीला मागे टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या महिन्यात शहराचा वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) 'खूप खराब' राहण्याची ही दुसरी वेळ आहे. SAFAR या संस्थेच्या अंदाजानुसार हवेची गुणवत्ता आणखी दोन दिवस खराब राहण्याची शक्यता आहे, जानेवारी हा हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत गेल्या पाच वर्षांतील सर्वात वाईट ठरण्याची शक्यता आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->