यशस्वी कराटे खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

यशस्वी कराटे खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित

दि. २८.०२.२०२३
Vidarbha News India - VNI
यशस्वी कराटे खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित 
महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शालेय राज्य क्रीडा कराटे स्पर्धे मधे कू. ईश्वरी चंद्रशेखर कडू यांचा सत्कार.

विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/ सचिन मून : 
अमरावती/धामणगाव रेल्वे : बोधी बुडोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया  महाराष्ट्र  राज्य धामणगाव रेल्वे येथे आयोजित कराटे बेल्ट परीक्षा घेण्यात आली व उत्तीर्ण खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्र वितरण धामणगाव रेल्वे येथे मोठ्या उत्सवात पार पडला स्थानिक तालुक्यात कराटे संस्कृती रुजवून तरुणांमध्ये आत्मरक्षन व बोधी बुडोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया संयुक्त विद्यमानाने 26 फेब्रुवारी 2023 रोजी कराटे  बेल्ट परीक्षा घेण्यात आले. या परीक्षेसाठी मुख्य परीक्षक भंते धम्मासार, कांबळे मुकेश कुमार पोलीस अधिकारी आदिलाबाद तेलंगणा. ब्लॅक बेल्ट 7th दान व
सह मास्टर आकाश पवार ब्लॅक बेल्ट 4th दान व मास्टर प्रेम कुमार ब्लॅक बेल्ट 2nd दान  आदीलाबाद तेलंगणा . मास्टर राहुल सर ब्लॅक बेल्ट, मास्टर अंगरिश कांबळे ब्लॅक बेल्ट, संध्य्या पवार ब्लॅक बेल्ट, प्रतूषा चौहान ब्लॅक बेल्ट, अनुष्का ब्लॅक बेल्ट, दीपिका ब्लॅक बेल्ट  आदिलाबाद तेलंगणा, येथून आले होते .बोधी बुडोकान कराटे असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष सचिन मून ब्लॅक बेल्ट 2nd दान  हे मुख्य प्रशिक्षक व सचिन चौधरी व मास्टर प्रतिभा नागलवाडे हे सुद्धा परीक्षक म्हणून उपस्थित होते. तब्बल सहा  तास चाललेल्या या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी आपले कराटे कला व प्रात्यक्षिक सादरीकरण केले. उपस्थित उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष भंते धम्मासार (महाराष्ट्र चीफ) भारतभाऊ चिकाटे (माजी सैनिक ) कुंभारे साहेब  (सामजिक कार्यकर्ते )व संचालन सूत्र अद्वैता वैद्य व सोनाली गुप्ता यांनी केले. प्रमुख पाहुणे यांनी दीप प्रज्वल करून कार्यक्रमाची सुरुवात केली व त्यांच्या हस्ते बोधी बुडोकान कराटे धामणगाव रेल्वे ची विद्यार्थ्यांनी कू. ईश्वरी चंद्रशेखर कडू राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धे बारामती पुणे येथील  तीने  दुतीय क्रमांक पटकावला. व नॅशनल चॅम्पियनशिप  KCR कप  हैद्राबाद, ऑनलाइन काता मधे धामणगाव रेल्वे तिल कराटे चमू कू. रुकया बोहरा गोल्ड मेडल, साक्षी अतलकर गोल्ड मेडल, सुहानी कोडमकर गोल्ड मेडल, व धर्य नागलवाडे यांना सुद्धा बेल्ट व गोल्ड मेडल देऊन  यांना शाल व पुष्प गुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समापन प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते बेल्ट व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले . व पाहुण्यांचे आभार प्रदर्शन सौ .प्रतिभा नागलवाडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी साठी सचिन चौधरी सर, प्रफुल बारसे सर, शिलानद झामरे, व सर्व बोधी बुडोकान कराटे च्या टीम ने प्रयत्न केले.

Share News

copylock

Post Top Ad

-->