चामोर्शीत तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहीत्य प्रदर्शन - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

चामोर्शीत तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहीत्य प्रदर्शन

दि. १२ फेब्रुवारी २०२३
Vidarbha News India - VNI
चामोर्शीत तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहीत्य प्रदर्शन      
शाळा हे विज्ञान प्रयोग संशोधनाचे केंद्र असावे; आ. डाॅ.देवराव होळी यांचे प्रतिपादन             
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : बालपणापासुन वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासत अधंश्रद्धेला थारा देऊ नये व विज्ञान हा दैनंदिन जीवन जगण्याचा भाग असल्याने विविध समस्यांची सोडवणुक करण्यासाठी शाळा हे विज्ञान प्रयोग संशोधनाचे केंद्र असावे असे  प्रतिपादन  गडचिरोली विधानसभा क्षेञाचे लोकप्रिय आमदार डाॅ.देवराव होळी यांनी काॅरमेल एकाडमी चामोर्शी येथे आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहीत्य प्रदर्शनीचे उदघाटन प्रसंगी केले.यावेळी व्यासपिठावरुन उदघाटक म्हणुन ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काॅरमेल एकाडमी चामोर्शीचे प्राचार्य फादर आसस्टीन आलेनचेरी होते.प्रमुख अतिथी म्हणुन माजी प.स.सदस्या धर्मशीला प्रमोद सहारे,भाजपा बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष  सुरेश शहा,भाजपा चामोर्शी तालुकाध्यक्ष दिलीप चलाख,तालूका महामंञी साईनाथ बुरांडे, चामोर्शी पं.स.चे गटशिक्षणाधिकारी नरेंद्र म्हस्के,शिवाजी कनिष्ठ महाविद्यालया चे प्राचार्य आर.एस. ताराम,यशोधरा विद्यालयाचे प्राचार्य श्याम रामटेके,जा.कृ.बोमनवार हाॅयस्कुलचे प्राचार्य इतेंद्र चांदेकर,कृषक हाॅयस्कुलचे मुख्याध्यापक अरविंद भांडेकर,नेताजी सुभाषचंद्र बोस हाॅयस्कुलच्या मुख्याध्यापिका एस.एस.गयाली,जेष्ठ भागशिक्षणाधिकारी रामभाऊ सातपुते,केंद्रप्रमुख हिम्मतराव आभारे, केंद्रप्रमुख गोटपर्तीवार सर,महाराष्टृ अंधश्रद्धा निर्मुलन समीतीचे शिवराम मोगरकर,प्रशांत नैताम उपस्थित होते.                              
यासह कार्यक्रमस्थळी तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहीत्य प्रदर्शनीत सहभागी सर्व शाळांचे विज्ञान शिक्षक सर्वश्री रघुनाथ भांडेकर,राजु धोडरे,विलास माळवे,दिलीप देवतळे,महादेव डे,बिजन मंडल,अशीम बिश्वास,गौरकर मॅडम,कोटगीरवार मॅडम,जितेंद्र मुसद्दीवार,कोचे सर,रामटेके सर,दासरवार सर,बंडु राठोड,सुभाष राॅय, येल्लेवार सर,सुनिल धाञक,सहारे सर,उके सर, तसेच कार्यक्रम व्यवस्थापक म्हणुन काॅरमेल एकाडमी चे अमरदिप चौधरी,प्रफुल शेंडे,गटसाधन केंद्र चामोर्शीचे डोंगरे सर,शेट्टे सर,पिपरे सर यासह सहभागी सर्व शाळांचे शिक्षक,शिक्षिका वृंद,कारमेल एकाडमी चे सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.               
कार्यक्रमाची सुरुवात अल्बर्ट आईनस्टाईन आणि ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली.विज्ञान व शैक्षणिक साहीत्य प्रदर्शनाच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागावा तसेच यशस्वी मानवी जीवन जगण्यासाठी विज्ञानाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणातुन काॅरमेल एकाडमीचे प्राचार्य फादर आसस्टीन आलेनचेरी यांनी केले.  याप्रसंगी मंचावरील प्रमुख अतिथी प्राचार्य शाम रामटेके,शिवराम मोगरकर यांनीही आपल्या मार्गदर्शनातुन मानवी जीवनात विज्ञानाचे फार मोठे महत्वाचे स्थान असे प्रतिपादन केले.                  
महाराष्टृ अंधश्रद्धा निर्मुलन समीतीचे श्री प्रशांत नैताम सर यांनी अंधश्रद्धा निर्मुलनावर आधारित काही प्रयोग उपस्थित विद्यार्थ्यांसमोर करुन दाखविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधीकारी नरेंद्र म्हस्के,संचालन प्रफुल शेंडे यांनी केले तर आभार सुरेखा सांगोळकर यांनी मानले.


Share News

copylock

Post Top Ad

-->