गडचिरोली : अनियंत्रित कार झाडावर धडकली, चालक युवक जागीच ठार - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली : अनियंत्रित कार झाडावर धडकली, चालक युवक जागीच ठार

दि. २२.०२.२०२३

Vidarbha News India - VNI

गडचिरोली : अनियंत्रित कार झाडावर धडकली, चालक युवक जागीच ठार

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली/कुरखेडा : पुराडावरून रामगडमार्गे मालेवाडाकडे जाणारी चारचाकी कार रानवाईजवळ अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला झाडावर धडकली.

यात चालक युवक गीतेश्वर ऊर्फ गोलू तिलक महाजन (वय २२) हा जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी रात्री घडली. या मार्गावर रात्री वर्दळ राहत नसल्याने रात्रभर त्याचा मृतदेह तिथेच पडून होता. बुधवारी सकाळी हा अपघात निदर्शनास आला.

मृत गोलू महाजन हा पुराडा येथील रहिवासी होता. रात्री तो एकटाच कारने (एमएच २९, एआर ०५२६) पुराडावरून मालेवाडाकडे काही कामानिमित्त जात होता. दरम्यान, रानवाईजवळ त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याचा बाजूला असलेल्या झाडावर धडकली. या अपघातात कारचा चक्काचूर होऊन गोलूचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मालेवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविला. पुढील तपास मालेवाडा पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

तीन दिवसांपूर्वीच झालं होतं साक्षगंध

ही घटना रात्रीची असल्याने हा अपघात कोणाच्या निदर्शनास आला नाही. सकाळी अपघाताची माहिती मिळताच रानवाई येथील गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मात्र चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे मृत गीतेश्वर ऊर्फ गोलू याचा तीन दिवसांपूर्वीच साक्षगंध कार्यक्रम झाला होता. तो रात्री काही कामानिमित्त सासुरवाडी असलेल्या मानपूर (छत्तीसगड)कडे जाण्याकरिता स्वत:चा वाहनाने एकटाच निघाला होता, अशी माहिती आहे.


Share News

copylock

Post Top Ad

-->