दि. ७ फेब्रुवारी २०२३
गोंडवाना विद्यापीठात ९ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : पदव्युत्तर शैक्षणिक इतिहास विभागाच्या वतीने एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा 'आदिवासीच्या ऐतिहासिक स्त्रोतांचे संकलन आणि वापर' या विषयावर नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा ,गोंडवाना विद्यापीठात आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे ,प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे ,कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन आणि या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या इतिहास विभागाचे प्रमुख उमेश बागडे राहतील. पहिल्या सत्रात दिल्ली विद्यापीठाचे प्रा. वर्जिनल खाखा, दुसऱ्या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. उमेश बागडे यांचे आणि त्यानंतर त्रिवेंद्रम, केरळ ,च्या विकास अभ्यास केंद्राचे डॉ.अभिलाष तडथील यांचे व्याख्यान होणार आहे.
या एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन इतिहास विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. रश्मी बंड यांनी केले आहे.