रेतीची गाडी सोडण्यासाठी लाचेची मागणी, पोलीस, दोन तलाठी, मंडळ अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

रेतीची गाडी सोडण्यासाठी लाचेची मागणी, पोलीस, दोन तलाठी, मंडळ अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

दि. १७.०२.२०२३

Vidarbha News India - VNI

Yavatmal ACB Trap | रेतीची गाडी सोडण्यासाठी लाचेची मागणी, पोलीस, दोन तलाठी, मंडळ अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

विदर्भ न्यूज इंडिया

प्रतिनिधी/यवतमाळ : रेतीचे रॉयल्टी परत करून गाड्या सोडविण्याकरिता तसेच कोणतीही कार्यवाही न करण्याकरिता 50 हजार रुपये लाचेची मागणी (Demand a Bribe) करणाऱ्या पोलीस नाईक, दोन तलाठी आणि एका मंडळ अधिकाऱ्यावर यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Yavatmal ACB Trap) गुन्हा दाखल केला आहे.

यवतमाळ एसीबीने (Yavatmal ACB Trap) 23 सप्टेंबर 2022 रोजी पडताळणी केली होती. त्यानंतर गुरुवारी (दि.16) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

मुकुटबन पोलीस ठाण्यातील (Mukutban Police Station) पोलीस नाईक संजय रामचंद्र खांडेकर (वय 38), झरी जामनी तहसील कार्यालयातील खातेरा येथील तलाठी नमो सदाशिव शेंडे (वय 38), मुकुटबन तलाठी रमेश फकिरा राणे (वय 48), मंडळ अधिकारी बाबूसिंग किसन राठोड (वय 53) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील 40 वर्षाच्या व्यक्तीने यवतमाळ एसीबीकडे (Yavatmal ACB Trap) तक्रार केली होती.

यवतमाळ एसीबीकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता पोलीस नाईक संजय खांडेकर यांनी तक्रारदार यांना त्यांचे वाहन मधील रेतीची रॉयल्टी (Sand Royalty) परत करून गाड्या सोडविण्याकरिता तसेच कोणतीही कार्यवाही न करण्याकरिता तलाठी नमो शेंडे यांचे मार्फत 50 हजार रुपये लाच मागितली. तसेच लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. तर तलाठी रमेश राणे यांनी तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम मिळवून देण्यास सहकार्य केले. तसेच मंडळ अधिकारी बाबू सिंग राठोड यांनी पंचासमक्ष लाचेची मागणी करून लाच रक्कम मिळवून देण्यास सहकार्य केले. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र पोलीस अधिक्षक मारुती जगताप (SP Maruti Jagtap),
अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत (Addl SP Arun Sawant), अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे (Addl SP Devidas Gheware),
उप अधीक्षक शैलेश सपकाळ (DySP Shailesh Sapkal) यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट (Police Inspector Dnyaneshwar Nalat),
पोलीस अंमलदार सचिन भोयर, अब्दुल वसीम, सुधीर कांबळे, राकेश सावसाकडे, महेश वाकोडे, चालक संजय कांबळे यांनी केली.

Share News

copylock

Post Top Ad

-->