दि.२७.०२.२०२३
Vidarbha News India - VNI
Maharashtra Talathi Bharti: नक्की कधीपासून सुरु होणार तलाठी अर्ज प्रक्रिया; महसूल मंत्र्यांनी सांगितली तारीख
विदर्भ न्यूज इंडिया
महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. मात्र अजूनही ही भरती प्रक्रिया सुरु झालेली नाही. मात्र आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून महाराष्ट्र तलाठी भरती प्रक्रिये संदर्भात महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
अहमदनगरमधील लोणी येथे महसूल परिषदेत बोलत होते. पण या भरतीसाठीची नेमकी पात्रता काय? याबद्दलची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
या पदांसाठी भरती विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi) एकूण जागा - 4122 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे. SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येणार आहे. इतका मिळणार पगार विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi)- 5,200/- ते रु.20,200/-.रुपये प्रतिमहिना अशा पद्धतीनं करा अप्लाय अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जदाराचे स्वतःचे gmail account आवश्यक आहे. अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक करावे. अर्जाची प्रत आपल्या gmail account वर प्राप्त होईल सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जा सह उपस्थित असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो