दि. ११ .०३ .२०२३
गोंडवाना विद्यापीठात मोफत स्वयंरोजगार प्रशिक्षण...
विदर्भ न्यूज इडिया
गडचिरोली : जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली तसेच गोंडवाना विद्यापीठा च्या संयुक्त विद्यमाने मोफत स्वयंरोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर,सॉफ्टवेअर डेव्हलपर, अॅप्लीकेशन डेव्हलपर व्हेब अॅन्ड मोबाईल या तिन्ही अभ्यासक्रमाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. ईच्छुक विद्यार्थ्यांनी १३ मार्च पर्यंत आधारकार्ड, टिसी, गुणपत्रिका व फोटोसह गोंडवाना विद्यापीठातील पहिल्या मजल्यावरील अल्फा अकॅडमी येथे अर्ज सादर करून प्रवेश घ्यावा तसेच अधिक माहिती साठी ९४०३०५०३७५ या भ्रमणध्वनी क्रमांका वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.