गडचिरोली : ठाण मांडून बसलेली वाघीण अखेर साडेचार तासाच्या प्रयत्नानंतर जेरबंद - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली : ठाण मांडून बसलेली वाघीण अखेर साडेचार तासाच्या प्रयत्नानंतर जेरबंद

दि.२०.०३.२०२३

                    Vidarbha News India

गडचिरोली : ठाण मांडून बसलेली वाघीण अखेर साडेचार तासाच्या प्रयत्नानंतर जेरबंद 

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली : गेल्या अनेक दिवसांपासून गडचिरोलीमध्ये एका वाघाणीचा वावर असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. त्यावाघीणीला पकडण्यासाठी आज जोरदार मोहीम राबवून वाघाणीला जेरबंद करण्यात आले.

साडेचार तासाच्या प्रयत्नानंतर गडचिरोली शहरात शिरलेल्या वाघिणीला वनविभागाने जेरबंद केले. त्यामुळे आता नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

गडचिरोली चंद्रपूर मार्गावरून एक वाघीण गडचिरोली शहरात आज दुपारच्या वेळेस आयटीआय कॅम्पसमध्ये शिरली होती.

वाघीण शहरात शिरल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. ही घटना वनविभागाला समजताच पकडण्यासाठी सापळा रचून वाघाणीला जेरबंद करण्यात आले.

या वाघिणीमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. वाघीण बघितल्यानंतर गडचिरोली शहरातही दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाघीणीचा वावर आहे असे समजल्यानंतर वन विभागानेही नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. साडेचार तासाच्या प्रयत्नानंतर वन विभागाने अखेर वाघीण सायंकाळी जेरबंद करण्यात आले.

या वाघीणीला पकडण्यासाठी गडचिरोली वन विभाग व पोलीस विभागाने प्रयत्न केल्याने जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. वाघीणीली पकडण्यात आल्यानंतर जेरबंद झालेल्या वाघीणीला पाहण्यासाठी नागरिकांनीही प्रचंड गर्दी केली होती.

सध्या गडचिरोली जिल्ह्यात जवळपास एक ते दीड वर्षापासून वाघांची प्रचंड दहशत आहे. ही दहशत कायम राहिली असून अजून काही वाघांचा वावर आहे का त्याचीही आता चौकशी सुरु करण्यात आली आहे.

मागील आठवड्यात रविवारी कुरखेडा मालेवाडा महामार्गावर वाघांचे दर्शन काही नागरिकांना झाले होते. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, देसाईगंज, आरमोरी या भागात अनेक पट्टेरी वाघ व बिबट्याच्या हल्ल्यात जवळपास आतापर्यंत 27 नागरिक ठार झाले आहेत.

Share News

copylock

Post Top Ad

-->