दि.१०.०३.२०२३
एकता शारदा महिला मंडळ व एकता महिला बचतगट तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गणेश नगर एकता महिला मंडळ व एकता महिला बचतगट तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
गणेश नगर गडचिरोली येथे महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून नुकतेच जागतिक महिला दिनानिमित्त केक कापून वयोवृद्ध महिलांचा सत्कार करण्यात येऊन विविध कार्यक्रमा घेण्यात आले. सदर कार्यक्रमात स्नेहा बोरकर व विविध महिलानी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोशना बुरलावार तर आभार प्रदर्शन मंडळाचे अध्यक्ष प्रिती सिडाम यांनी केले. कार्यक्रमात मनीषा ढवळे,मनीषा प्रवीण चन्नावार, वर्षा भोयर, कविता चकनारपवार,संध्या मारभते,लता नैताम,मंगला फुलझेले,लीना कोडापे,कविता होळी, मनीषा हुलके,सुवर्णा चौधरी, वेरूली म्याडम,मंजुषा खरवडे,डोगरा म्याडम,मीटावार म्याडम, प्रणाली कुंभरे,वंदना पेंदाम, रजनी गेडाम, सपना दत्ता,प्रिती सिडाम,रोशनी बुर्लावार,लता बोदेले,सुलोचना आलाम,लक्ष्मीबाई होळी,रेखा नरोटे, व बऱ्याच महिला उपस्थित होत्या.