दि.०९.०३.२०२३
देवाडा बुज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न...
विदर्भ न्यूज इंडिया
चंद्रपूर : -
ता.प्र/पोभुर्णा : तालुक्यातील देवाडा बुज येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या सहायक शिक्षिका रामटेके मॅडम ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक शंकर आत्राम शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सर्जना मेश्राम शाळेच्या माजी विद्यार्थीनींनी श्वेता विकास शेडमाके शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या पुष्पा ईटकलवार सुषमा वांढरे पोर्णिमा राऊत उज्वला बोकडे शाळेचे विषय शिक्षक रूपेश परसवार साहयक शिक्षक वाल्मिकी निमसरकार अशोक आलाम राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विकास भाऊ शेडमाके इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी कांपुटर इन्स्टिट्यूट मध्ये 85 टक्के गुण मिळवून गुणवत्ता प्राप्त करणार्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी श्वेता विकास शेडमाके यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक शंकर आत्राम यांनी केले तर सुत्र संचालन विषय शिक्षक रूपेश परसवार सर यांनी केले उपस्थित मान्यवरांनी जागतीक महिला दिना संबंधी प्रकाश टाकुन विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे मनें जिंकली.