दि.३०.०३.२०२३
लोकमंगल संस्था घोट येथे महिला संमेलन संपन्न.
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/चामोर्शी : महिलांना अजूनही सामाजिक स्वातंत्र्य मिळालेले नाही मिसेस युनिव्हर्सर्सिटी पुरस्कार विजेती एडवोकेट कविता मोहरकर यांचे उद्गार. लोकमंगल संस्था घोट व सामूहिक महिला परिषद यांचे संयुक्त विद्यमाने दि. २९ मार्च ला लोकमंगल संस्था घोट येते महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना दैनंदिन जीवनातून बाहेर निघून त्यांना आनंद मिळावा या उद्देशाने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा व गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावातून महिला उपस्थित झाल्या होत्या महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम गीत गायन, नृत्य, पथनाट्य सादर करून आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांचा परिचय दिला विशेष अतिथी स्थानावरून बोलताना एडवोकेट कविता मोहरकर बोलताना पुढे म्हणाल्या भारतीय संविधानाने महिलांना स्वातंत्र्य दिले असले तरी आपल्या समाजाने मात्र मात्र अजूनही ते स्वातंत्र्य स्वीकारले नाही स्त्रियांना पाहिजे तसे वावरता येत नाही, मनमोकळेपणाने वागता येत नाही, बोलता येत नाही असे अनेक प्रश्न आहेत. सामाजिक बंधनातून मुक्त व्हायचे असेल व समाजाच्या मुख्य प्रवाहात महिलांना आपले स्थान निर्माण करायचे असेल तर महिलांनी एकजुटीने एकत्र येऊन लढावे लागेल. महिलांनी जोपर्यंत एकत्र येऊन आक्रोश करणार नाही, आंदोलन करणार नाही, लढणार नाही, स्वतःला सिद्ध करणार नाही, तोपर्यंत सामाजिक स्वातंत्र्य मिळणार नाही असे विचारमंचावरून आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सिस्टर शायनी मॅडम, उद्घाटिका श्रीमती सावित्राबाई पेंदोर , विशेष अतिथी एडवोकेट कविता मोहरकर मॅडम, डॉक्टर विवेक हजारे सर वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र घोट. श्री गीत भाऊ उपाध्ये. पत्रकार हेमंत उपाध्ये होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनी कांबळे ,संचालन मेघा कुंबरे, आभार प्रदर्शन मनीषा वाकुडकर यांनी मानले सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील नेवारे उमाजी कुद्रपवार रुपेश कुमरे तसेच लोकमंगल संस्था घोट येथील कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.