दि.१९.०३.२०२३
बूथ विस्ताराच्या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे; आ. डॉ. देवरावजी होळी
- बूथ शशत्तीकरण अभियान अंतर्गत तालुका चामोर्शीची डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख बैठक
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/ चामोर्शी : बूथ शशत्तीकरण अभियान बूथ विस्तार योजने अंतर्गत प्रत्येक शक्तीकेंद्राला प्रभारी नेमून शक्तीकेंद्र प्रमुख व प्रभारी यांची प्रत्येक बूथावर बैठक घेणे, व्हाट्सअप ग्रुप तयार करणे,पन्ना प्रमुख यांना जबाबदारी देणे. मन की बात प्रमुख नेमणे,सरल अपमध्ये बूथावरील माहिती भरणे, फ्रेंड्स ऑफ बीजेपी जोडणे, लाभार्थांची यादी तयार करून धन्यवाद मोदीजी पोस्ट कार्ड पाठविणे, नमो आप उपलोड करणे, ६ एप्रिल स्थापना दिनानिमित्य घरावर झेंडा लावणे, नवमतदार नोंदणी करणे, प्रत्येक बूथावर युवां वारिअर्स जोडणे, सोशल मिडीया प्रमुख नेमणे, १५ मार्च २६ मार्चपर्यंत बूथ विस्तार योजना तालुक्यात राबविण्यासाठी या बूथ विस्ताराच्या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असे आ. डॉ. देवरावजी होळी यांनी केले.
बूथ शशत्तीकरण अभियान अंतर्गत तालुका चामोर्शीची डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्तीकेंद्र प्रमुख , बूथ प्रमुख बैठक पार पडली बैठकीला दिलीपजी चलाख तालुकाध्यक्ष, सुरेशजी शहा बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष, भास्कर बुरे जिल्हा महामंत्री, साईनाथ बुरांडे तालुका महामंत्री , तालुक्यातील शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख यांच्या उपस्तीतीत बैठक प्रामुख्याने उपस्थित होते.