दि. ३.०४.२०२३
गोंडवाना विद्यापीठाच्या पंचवार्षिक बृहत आराखडा विषयक अभिप्राय संदर्भ...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली चा पंचवार्षिक बृहत आराखडा (२०२४-२९) तयार करण्यात येत असून त्याकरीता राज्य शासनाच्या उच्च शिक्षण व तंत्र विभागातर्फे राज्याचा उच्च शिक्षण नकाशा पुस्तक तयार करण्यात येत आहे. या संदर्भात नविन महाविद्यालय, नविन अभ्यासक्रम, अतिरिक्त तुकडी व कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम इत्यादी बाबत ऑनलाईन सर्वेक्षण द्वारे संबंधीत भागधारकांकडून अभिप्राय मागविण्यात येत आहे. करिता विद्यापीठ परिक्षेत्रातील समस्त विद्यार्थी वर्ग, पालक, शिक्षक, प्राचार्य, संस्थाचालक, शासकिय अधिकारी, लोक प्रतिनीधी व विद्यापीठाच्या संवैधानिक मंडळाच्या सदस्यांना या वृत्ताद्वारे जाहिर आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी http://wagi.ncog.gov.in/MaharashtraEducation/Mhedu2/Suggestion या लिंक वर आपल्या मोबाईलद्वारे अथवा संगणकद्वारे आपला अमूल्य अभिप्राय द्यावा. सदर लिंक विद्यापीठ संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे.