दि. १९.०४.२०२३
शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन नागरीकांनी आपला आर्थिक विकास साधावा...गडचिरोली :
प्रतिनिधी/चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील घोट येथे 18 एप्रिल रोजी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अमलबजावणी अभियान अंतर्गत जिल्हाधिकारी संजय मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नियोजनातून जिल्हा प्रशासन गडचिरोली उपविभाग चामोर्शी यांच्यावतीने शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम बोलत होते. गरीब जनतेला कार्यालयामध्ये जाऊन विविध प्रकारचे दाखले घेणे अडचणीचे होत असल्याने नागरिकांना प्रत्यक्ष लाभ कसा देता येईल या उद्देशाने येथील जिल्हा परिषद महात्मा गांधी हायस्कूलच्या पटांगणात शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये नागरिकांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यना मंजुरीआदेश राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप कास्ट सर्टिफिकेट, अधिवास प्रमाणपत्र ,वनपट्टे ,ट्रॅक्टर अनुदान, मानव विकास मिशन अंतर्गत शालेय मुलींना सायकलचे वाटप, सातबारा, नमुना आठ, रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड अश्याअनेक योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चामोर्शीचे तहसीलदार संजय नागटिळक, नायब तहसीलदार सुखदेव कावडे, तहसीलदार गिरीश नरोटे, सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही. एन. वनखंडे, घोट ग्रामपंचायतच्या सरपंच रुपाली दुधाबावरे तालुका आरोग्य अधिकारी हुलके घोट वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एस. वाडीघरे, जिल्हा परिषद चे माजी सदस्य नामदेवरावजी सोनटक्के, संजय वडडेट्टीवर, महसूल मंडळ अधिकारी एस डी शिंपी, मंडळ अधिकारी ढोरे, मंडळ अधिकारी फुलझेले, मक्केपलीच्या सरपंच संगीता वैरागडे माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकला आत्राम, सरपंच आदित्य कांदो, गटशिक्षणाधिकारी एन. सी. मस्के, घोट येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे प्राचार्य दुर्गाप्रसाद पाल, सीला सोमनकर, पौर्णिमा हलदार उपस्थित होते. आरोग्य विभाग घोट वनविभाग, पशुवैद्यकीय विभाग, तसेच उमेद हिसाब बँक या सर्वांचे स्टाल लावून योजनांची माहिती देण्यात आली वरील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारीवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार संजय नागटिळक यांनी केले संचालन नवनाथ अतकरे मंडळ अधिकारी येणापूर तर आभार प्रदर्शन वसंत आलाम तलाठी वरळ यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी घोट साजा चे तलाठी साईनाथ कुळयेटी व महसूल मंडळ घोटचे सर्व कोतवाल बंधू यांचे विशेष सहकार्य लाभले.