दि. ३०.०४.२०२३
Vidarbha News India
Gadchiroli News: गडचिरोलीत ३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश; मन्नेराजाराम जंगलातील घटना
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोलीत पोलिसांनी ३ नक्षलवाद्याच्या खात्मा केला आहे. मृतकात पेरमिली दलम कमांडर बिठलु मडावीचा समावेश आहे.
मन्नेराजाराम जंगलातील ही घटना आहे. आताही चकमक सुरू असल्याची माहिती मिळत आहे . (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकाने चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खत्मा केला आहे. या चकमकीत पोलीस भरतीत सहभागी होणाऱ्या साईनाथची हत्या करणारा पेरमिली दलम कमांडर बिठलु मडावीचाही खात्मा झाला आहे. भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम जंगलात रविवारी सांयकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जवानांनी ही कारवाई केली आहे.
गडचिरोली पोलिसांचे सी-60 जवान मन्नेराजाराम जंगलात नक्षल विरोधी अभियान राबवत असताना लपून बसलेल्या नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. या चकमकीत तीन पुरुष नक्षलींचा खात्मा केला आहे.
नक्षलीमधील एकाची ओळख पटली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. महाराष्ट्र दिनाच्या तोंडावर गडचिरोली पोलिसांनी केलेली ही कारवाई नक्षलवाद्यांसाठी मोठा झटका मानला जात आहे.