बापरे! शेतकरी पिकाला पाणी देत होता, अचानक बिबट्याने झडप घातली, अन्..! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

बापरे! शेतकरी पिकाला पाणी देत होता, अचानक बिबट्याने झडप घातली, अन्..!

दि. ०५.०४.२०२३

Vidarbha News India

बापरे! शेतकरी पिकाला पाणी देत होता, अचानक बिबट्याने झडप घातली, अन्..!चांदवडची घटना

विदर्भ न्यूज इंडिया

नाशिक :  (Nashik District) शहरासह पश्चिम पट्ट्यातील भागात बिबट्याचा वावर नित्याचा आहे. निफाड, सिन्नर, त्र्यंबकेश्वेर आदी भागात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनाही रोजच ऐकायला मिळत आहेत.

आता चांदवड तालुक्यात बिबट हल्ल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील कानमंडळे येथील शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

नासिक (Nashik) जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट हल्ल्याच्या (Leopard Attack) घटना वाढत आहेत. जिल्ह्यातील निफाड, सिन्नर भागातील शेतकरी नेहमीच भीतीच्या सावटाखाली असतात. आता शहरी भागातला वावरही वाढल्याचे चित्र आहे. चावंड तालुक्यातील कानमंडाळे येथील भगवंत गोविंद चौधरी (Bhagwant Chaudhari) हे शेतकरी सकाळी पिकाला पाणी देत असताना अचानक आलेल्या बिबट्याने (Leopard) त्यांच्यावर हल्ला केला. त्यात चौधरी गंभीर जखमी झाले. चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कानमंडाळे शिवारात सोमवारी (3 एप्रिल) सकाळी आठ वाजेच्या सुमारास काही शेतकऱ्यांना बिबट्या दिसला. यावेळी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बचावासाठी प्रयत्न केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.

दरम्यान काही अंतरावर शेतात काम करत असलेल्या चौधरी यांच्यावर त्याने हल्ला चढवला. यावेळी आसपासचे रहिवासी तात्काळ मदतीला धावल्याने बिबट्या पसार झाला. या घटनेची माहिती सरपंच संजय शिंदे यांनी त्वरित वनविभागाला (Nashik Forest) दिली. वनविभागाने येथे पिंजरा लावला आहे. मात्र, या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. आता त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील काही भागात हा वावर अधिकच वाढल्याचे चित्र आहे. अशातच त्र्यंबकेश्वर शहराच्या उत्तर बाजूस असलेल्या बिल्वतीर्थ तलाव, नीलपर्वत परिषदेच्या परिसरात रविवारी सायंकाळी उशीरा तसेच सोमवारी पहाटे बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीती आहे.

बिबट्याने गेल्या तीन महिन्यांत तीन बालकांवर झडप घालून ठार केल्याच्या घटना धुमोडी, वेळुंजे आणि ब्राह्मणवाडे येथे घडल्या आहेत. त्यापूर्वी दुगारवाडी जवळही दोन वेळा बालकांवर हल्ला झाला. या घटनांनी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बिल्वतीर्थ परिसरात असलेल्या वस्तीत बिबट्या येत असल्याचे आणि कोंबड्या, कुत्री उचलून घेऊन जात असल्याची मागच्या काही दिवसांपासून नागरिकांची तक्रार आहे. दरम्यान ब्राह्मगिरी पश्चिम बाजूला सध्या झाडी विरळ झाली आहे. कारण अनेक भागांत फार्म हाऊस असल्याने जागोजागी विद्युत दिव्यांचा झगमगाट दिसून येत आहे. यामुळेच बिबटे आणि अन्य वन्यप्राणी लग्नस्तंभाच्या टेकडीच्या बाजूने बिल्वतीर्थ तलाव आणि नीलपर्वताकडे येत असतात.

त्र्यंबक शहर परिसरात संचार

दरम्यान आता त्र्यंबक तालुक्यासह शहरात देखील बिबट्याच्या वावर असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. शहरातील नीलपर्वत परिसरात पहाटे आणि सायंकाळी दर्शनासाठी भाविक येतात. या भाविकांना काही वेळा बिबट्याचे दर्शन झाल्याने त्यांच्यात भीती निर्माण झाली आहे. बिबट्याकडून परिसरातील कुत्र्यांची शिकार केली जात असल्याची चर्चा आहे. जव्हार रस्ता परिसरातील पोल्ट्री व्यावसायिक मृत कोबंड्या जवळच फेकतात. त्याच्या वासाने बिबट्या येत असल्याचे बोलले जात आहे. जव्हार रस्त्याच्या बाजूने मासे, मटणविक्री करणारे व्यावसायिक, हॉटेल, ढाबेचालक त्यांच्या दुकानातील कचरा बाजूला फेकतात. त्याच्या वासाने तरस, कुत्री जमा होतात. त्यामुळेही बिबट्याचा वावर वाढल्याचे म्हटले जात आहे. नगर परिषद प्रशासनाकडून तातडीने बंद पथदीप सुरु करण्यात येत आहेत. वन खात्याने पिंजरे मागितले असून, आज नीलपर्वत परिसरात ठेवण्यात येणार आहेत.

Share News

copylock

Post Top Ad

-->