दि. ०२.०५.२०२३
गोंडवाना विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : १ मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त गोंडवाना विद्यापीठात कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी ध्वजारोहण केले. याप्रसंगी राष्ट्रगीत आणि राज्यगीत गाण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. शैलेंद्र देव, अधिष्ठाता मानवविद्या विज्ञान शाखा डॉ. चंद्रमौली,संचालक परीक्षा व मुल्यमापन डॉ. अनिल चिताडे, रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे, नवसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. मनिष उत्तरवार, संचालक क्रिडा व शारिरीक शिक्षण डॉ.अनिता लोखंडे यांच्यासह अधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे महत्व विषद केले आणि सर्वांना महाराष्ट्रदिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.