दि. १७.०५.२०२३
गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या अधिष्ठातापदी (प्रभारी) डॉ. अनिल चिताडे
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या अधिष्ठाता (डीन) पदाचा प्रभारी पदभार डॉ. डॉ. अनिल चिताडे यांनी नुकताच स्वीकारला. यापूर्वी विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून डॉ.शैलेंद्र देव यांच्याकडे पदभार होता. परंतु चंद्रपुर जिल्यातील कोरपना तालुक्यातील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात प्राचार्य पदी ते रुजू झाले आहेत. म्हणून हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता (डीन) पदाचा प्रभारी पदभार डॉ. अनिल चिताडे यांनी नुकताच स्वीकारला.
डॉ. अनिल चिताडे सद्या गोंडवाना विद्यापीठात परीक्षा संचालक म्हणून सेवा देत आहेत. कुलसचिव (प्रभारी) पदाचा यशस्वीपणे कार्यभारही त्यांनी सांभाळला आहे.
या निमित्ताने कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, अधिष्ठाता मानव विज्ञान शाखा डॉ. चंद्रमौली, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. विवेक जोशी, उपकुलसचिव डॉ. देवेन्द्र झाडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.