खा. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय महामार्ग सिरोंचा ते रेपनपल्ली या रस्त्याचे भूमिपूजन सोहळा संपन्न - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

खा. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय महामार्ग सिरोंचा ते रेपनपल्ली या रस्त्याचे भूमिपूजन सोहळा संपन्न

दि.०५.०५.२०२३
Vidarbha News India
खा. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय महामार्ग  सिरोंचा ते रेपनपल्ली या रस्त्याचे भूमिपूजन सोहळा संपन्न 
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/सिरोंचा :  मा. खासदार श्री. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय महामार्ग एन एच -३५३ वरील सिरोंचा ते रेपनपल्ली विभागातील ५९ किलोमीटर रस्त्याचे भूमिपूजन समारंभ आज दिनांक ०५ मे २०२३ ला सिरोंचा येथे संपन्न झाला.
तसेच या प्रसंगी खासदार महोदयांनी सिरोंचा व रेपनपल्ली या रस्त्यांची समस्या बरेच दिवसापासून होती ती आज पुर्ण झाली.या रस्त्यांच्या कामाविषयी संबंधित कंत्राटदार व इंजिनिअर यांना दर्जेदार व चांगल्या क्वॉलिटीचे काम करण्याच्या सूचना दिल्या.
या रस्त्याच्या भूमिपूजन समारंभाला जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे,नवनिर्वाचित विशेष प्रदेश सदस्य रविंद्र ओल्लालवार,जिल्हा उपाध्यक्ष दामोदर अेरिगेलवार,
जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकंपलीवार,तालुकाध्यक्ष शंकर नरहरी,तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, इंजिनिअर नितिन बोबळे, इंजिनीअर सांरग गोगटे,जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत शुगरवार, युवा मोर्चाचे ता. अध्यक्ष राजेश संतोषवार, ता.महामंत्री माधव कासरलावार, जिल्हा सचिव संदिप राचरलावार,मन कि बात संयोजक तथा जि. उपाध्यक्ष सतिश पाळमटेंनटी,शहराध्यक्ष सितापती गटटु,ओबिसी आघाडी.ता.अध्यक्ष रमेश मुंगीवार,ओबिसी आघाडी उपाध्यक्ष नागेश ताडबोईना, तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, मोठ्या संख्येने या रस्त्याच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->