मुख्याध्यापकांना नवीन वेतनश्रेणी, पण लाभ कोणाला मिळणार? वाचा सविस्तर... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

मुख्याध्यापकांना नवीन वेतनश्रेणी, पण लाभ कोणाला मिळणार? वाचा सविस्तर...

दि. ०५.०५.२०२३

Vidarbha News India 

मुख्याध्यापकांना नवीन वेतनश्रेणी, पण लाभ कोणाला मिळणार? वाचा सविस्तर...

विदर्भ न्यूज इंडिया

नागपूर : शासनाने पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यासाठी बक्षी समिती गठीत केली होती. त्यानुसार सर्व पातळीवरील शाळांच्या मुख्याध्यापकांना वेतनश्रेणी मिळाली.

फक्त अकरावी व बारावीचे वर्ग असणाऱ्या स्वतंत्र उच्च माध्यमिक म्हणजेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना ही नवीन वेतनश्रेणी लागू झाली नव्हती. स्वतंत्र म्हणजे जे माध्यमिक शाळांशी सलग्न नाहीत असे. या उच्च माध्यमिक शाळांचेच मुख्याध्यापक सुटले होते. त्यांनाही आता लाभ मिळणार आहे.

इतर उच्च माध्यमिक प्रमाणे जुन्या ४४ ९००- १४२४०० या श्रेणी ऐवजी ४७६०० – १५११०० ही श्रेणी मिळणार. मात्र तो मुख्याध्यापक पदव्युत्तर पदवीधर व बी.एड असावा. पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे १ जानेवारी २०१६ पासून हे लाभ मिळणार आहेत. तसेच तबलजी या पदाससुद्धा नवी वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. त्यांना १९९०० – ६३२०० ऐवजी आता २५५०० – ८११०० अशी सुधारित श्रेणी मिळणार. मात्र, पूर्वलक्षी प्रभावाने मिळणार नसल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->