दि. १९.०६.२०२३
Vidarbha News India
Accident News : गडचिरोलीचे प्रसिद्ध रांगोळीकार युवराज बेहरे यांचा अपघाती मृत्यू
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध रांगोळीकार युवराज व्यंकट बेहेरे (वय ५०) रा. गडचिरोली यांचा रविवार (ता. १८) नागपूर-अमरावती महामार्गावर पहाटे ४ वाजता कोंढाळी या गावाजवळ अपघातात मृत्यू झाला.
या अपघातात त्यांची पत्नी विभा बेहरे (वय ४५) जखमी झाल्या असून त्या नागपुर रुग्णालयात भरती आहेत.
मृत युवराज बेहरे आपल्या स्वतःच्या एमएच ३४ व्ही ३४२९ वाहनाने कुटुंबीयांसह महाराष्ट्र दर्शनासाठी गेले होते. शेगाव दर्शन करून आपल्या घरी परतत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. तसेच चालक ऋषी बोरकुटे रा. काटली (वय ३०) हे गंभीर जखमी आहेत. नागपूर येथील खासगी इस्पितळात भरती आहेत. बेहरे यांच्या पश्चात दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने बेहरे परिवारावर शोककळा पसरली आहे.