दि. ०८.०६.२०२३
Vidarbha News India
Cyclone Biporjoy - बंगालच्या उपसागरात 'बिपरजॉय' वादळाचा धोका वाढला; 'या' जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
विदर्भ न्यूज इंडिया
'मोचा' चक्रीवादळानंतर आता आणखी एक चक्रीवादळ 'बिपरजॉय' चा भारताच्या किनारपट्टीला धोका निर्माण झाला आहे. अरबी समुद्राच्या आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने 'बिपरजॉय' चक्रीवादळाची निर्मिती झाल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) मंगळवारी दिली.
देशाच्या किनारपट्टी भागांवर घोंगावत असलेले वादळ महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टी भागांपासून फारसे दूर नाही. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, बुधवारी या चक्रिवादळानं पुन्हा एकदा रौद्र रुप धारण केलं आणि आज गुरुवारी (8 जून) त्याचे तीव्र स्वरूप दर्शवू शकतात. एवढेच नाही तर 9 जून रोजीही हे वादळ मोठे रुप धारण करेल असंच काहीसं रुप पाहायला मिळत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राचं आता चक्रीवादळामध्ये रूपांतर झालं आहे. हे चक्रीवादळ वेगाने उत्तरेकडे सरकताना दिसत आहे. दरम्यान देशात या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला असून पुढील 24 तासांत काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वादळाचा थेट परिणाम केरळ-कर्नाटक आणि लक्षद्वीप-मालदीवच्या किनारपट्टीवर दिसून येईल अशी माहिती समोर आली आहे. यासोबतच कोकण-गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवर 8 ते 10 जूनदरम्यान समुद्रात खूप उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.