शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार, 36 शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे एसीबीला पत्र - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार, 36 शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे एसीबीला पत्र

दि. ०६.०६.२०२३

Vidarbha News India

शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार, 36 शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे एसीबीला पत्र

विदर्भ न्यूज इंडिया

मुंबई : शिक्षण क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील 36 शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे पत्र शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी एसीबीला लिहिले आहे. शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याने आयुक्तांनी एसीबीला पत्र लिहिले आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विभागामध्ये पैशाच्या मोबदल्यात बदल्या झाल्याची बातमी एबीपी माझाने प्रसारित केल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील अनेकांकडून शिक्षण क्षेत्रात बदलीसाठी होत असलेला भ्रष्टाचार उघड करण्याची मागणी होत आहे.

शिक्षकांवर छापे पडले त्यांची खुली चौकशी करण्याची मागणी

शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. अधिकारी लाच घेताना पकडले जातात मात्र पुन्हा सेवेत येतात, पुन्हा भ्रष्टाचार करतात पण कारवाई होत नाही. त्यामुळे आयुक्त सुरज मांढरे यांनी एसीबीला पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. ज्या शिक्षकांवर छापे पडले त्यांची खुली चौकशी करण्याची मागणी एसीबीला लिहिलेल्या पत्रात सूरज मांढरे यांनी मागणी केली आहे. काही अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

राज्यातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात गेल्या काही वर्षांपासून भ्रष्ट कारभाराची कीड लागली आहे. शिक्षक बदल्यांसाठी अनेक अधिकारी आणि कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याच्या अनेक घटना समोर आल्य आहे. शिक्षक बदलीच्या फायलीवर आर्थिक वजन ठेवल्यानंतर शिक्षकांना सोयीच्या जिल्ह्यात बदली झाल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही वर्षात आपण पाहिली आहे. एवढच काय तर शिक्षक बदलीसाठी दरपत्रक देखील ठरल्याच्या चर्चा आहेत. साधी फाईल एका टेबल वरून दुसऱ्या टेबलवर पाठवण्यासाठी देखील पैसे घेतले जातात. एका प्रकरणात आउटवर्ड करून देण्यासाठी वीस हजार रुपयेची लाच घेण्यात आली. साधा लिपिक देखील मोठ्या कारमध्ये येतो. पैशाच्या मोबदल्यात बदल्या केल्या जातात.

शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे दर पत्रक

  • कायम मुख्याध्यापक मान्यतेसाठी - एक ते दीड लाख रुपये
  • शालार्थ प्रकरणांसाठी - 80 हजार ते एक लाख रुपये
  • मेडिकल बिल मंजुरीसाठी - बिलाच्या रकमेच्या पाच ते 20 टक्क्यांपर्यंत
  • शिक्षक बदलीसाठी - 50 हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत

सरकारी कार्यालये, पोलिस स्थानकात भ्रष्टाचार चालतोच पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतो त्या शिक्षण क्षेत्रात देखील भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. गेल्या काही वर्षात एसीबीने उघड केलेली प्रकरणे पाहता भ्रष्टाचाराचा हा चढता आलेख चिंता वाढवणरा आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->