दि. २३.०६.२०२३
Vidarbha News India
गडचिरोली : घोटसूर-कारका मार्गावरील तुटलेला पूल दुरुस्त करा
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील (Ghotsur-Karka road bridge) घोटसून-करका मार्गावरील तुटलेल्या पुलाचे तात्काळ दुरुस्त करण्यात यावे, अशा मागणी खासदार अशोक नेते यांच्याकडे घोटसूर-कारका येथील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
मागील 2019-20 या वर्षात कसनसूर-कारका (बु.) या पोच रस्त्याचे खडीकरण करून पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. तेव्हा घोटसूर ते कारका मार्गावरील लहान नाल्यावरील पुलाचेचेही बांधकाम करण्यात आले होते.
मात्र, Ghotsur-Karka road bridge निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे केवळ एका वर्षातच सदर पूल तुटलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुलाअभावी परिसरातील नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. तरी संबंधित विभागामार्फत सदर पुलाची चौकशी करून तात्काळ दुरुस्त किंवा नवीन पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी घोटसूर, कारका यासह परिसरातील नागरिकांनी खासदार अशोक नेते यांच्याकडे निवेदनातून केली आहे. दरम्यान, खसदार अशोक नेते यांनी सबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून तात्काळ पूलाची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे लवकरच सदर पुलाची दुरुस्ती होऊन नागरिकाचा रहदारीचा प्रश्न सुटणार आहे.
घोटसूर बससेवा पूर्ववत करा
गडचिरोली-कसनसूर ते घोटसूर Ghotsur-Karka road bridge ही बससेवा तात्काळ सुरु करण्यात यावी, अशा मागणीचेही निवेदन घोटसूर परिसरातील नागरिकांनी खासदार अशोक नेते यांना दिले. मागील 5 वर्षापूवी सदर बससेवा सुरु होती. मात्र, रस्ता व भौगोलिक परिस्थितीमुळे ही बससेवा बंद करण्यात आली. मात्र, आता कसनसूर ते घोटसूर या मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण होऊन पुलाचे बांधकामही करण्यात आले आहे. त्यामुळे आता सदर बससेवा सुरु करण्यास काही अडचण नाही. सदर बससेवा सुरु झाल्यास परिसरातील मानेवारा, घोटसूर, जवेली, शेवारी आदी गावातील नागरिक व विद्यार्थ्यांना सोयीचे होईल. तसेच शासकीय कामाकरीता जिल्हा मुख्यालय व तालुकास्तरावर वेळेवर पोहचण्यास सोयीचे होईल. त्यामुळे सदर बसे सुरु करावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान या सदंर्भातही खासदार अशोक नेते यांनी विभागीय नियंत्रकांशी भ्रमणध्वनीरून संपक करून सदर बस तात्काळ सुरु करण्याचे निर्देश दिले.