MPSC एमपीएससी परिक्षेत राज्यातून सहाव्या आलेल्या तरुणीची हत्या, मित्र फरार..! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

MPSC एमपीएससी परिक्षेत राज्यातून सहाव्या आलेल्या तरुणीची हत्या, मित्र फरार..!

दि. २०.०६.२०२३

Vidarbha News India

MPSC एमपीएससी परिक्षेत राज्यातून सहाव्या आलेल्या तरुणीची हत्या, मित्र फरार..!

विदर्भ न्यूज इंडिया

पुणे : एमपीएससी' परीक्षेत उत्तीर्ण होऊन वनपरिक्षेत्र अधिकारी झालेल्या दर्शना पवार यांचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. दर्शनाचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या सतीचा माळ परिसरात रविवारी सापडला होता.

त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला होता. दरम्यान, याप्रकरणी त्यांच्यासोबत गडावर फिरण्यासाठी गेलेला मित्र पसार झाल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच पथके तयार केली दर्शना दत्ता पवार (वय 26, रा. कोपरगाव, जि. नगर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून दर्शना यांची निवड करण्यात आली होती. एमपीएससी परीक्षेत त्या राज्यातून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. दर्शना आणि त्यांचा मित्र राहुल हांडोरे १२ जूनला दुचाकीवरून वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ला परिसरात गेले होते. सकाळी सव्वासहाच्या सुमारास दोघे गडाच्या पायथ्याशी पोहोचले. दोघांनी गड चढायला सुरुवात केली. सकाळी 10 च्या सुमारास राहुल गडावरून एकटाच खाली आला.

राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणातून माहिती उपलब्ध झाली आहे. दर्शनाचा मित्र राहुल पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. दर्शना यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्यात मारहाण करून खून केल्याचे उघडकीस आले आहे.

MPSC - Darshana Dutta Pawar 

Share News

copylock

Post Top Ad

-->