दि.२३.०६.२०२३
Vidarbha News India
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू 5 जुलै रोजी गडचिरोलीत
President Draupadi Murmu :
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे प्रशासकीय इमारतीचे शीलान्यास व दीक्षांत समारोह या कार्यक्रमासाठी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी राष्ट्रपती महामहीम द्रोपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन नई दिल्ली येथे भेट घेऊन गडचिरोलीला येण्यासंदर्भात संबधित चर्चा करून निवेदनाद्वारे विनंती केली.
त्यांच्या विनंतीला मान देऊन राष्ट्रपती दौपदी मुर्मू या येत्या 5 जुलै रोजी गडचिरोली येथे येणार असल्याचे मान्य केल्याची माहिती खसदार अशोक नेते यांनी दिली आहे.
खासदार नेते यांनी 10 मे रोजी त्यांची भेट घेत घेऊन मागणी केली होती. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आकांक्षीत, अविकसित नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच राष्ट्रपती येणार हे एक इतिहासातील पहिलीच घटना असेल. त्यामुळे याचे तुम्ही साक्षीदार होण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही खासदार अशोक नेते यांनी केले आहे.
(President Draupadi Murmu) Gadchiroli