दि. ०५.०६.२०२३
आश्रमशाळेत रोजंदारी व तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घ्या...
- आश्रमशाळेत कार्यरत तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना निवेदन
- शासन स्तरावर पाठपुरावा करणार आमदार डॉ देवराव जी होळी यांचे निवेदकांना आश्वासन
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : आदिवासी विभागातील १० वर्षावरील रोजंदारी तासिका तत्त्वावरील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने सेवेत नियमित केलेले आहे. मात्र १० वर्षाखालील कर्मचाऱ्यांनी आदिवासी विभागात अत्यंत तुटपुंज्या मानधनावर बिकट परिस्थितीचा सामना करून सेवा दिली आहे. मात्र पुर्ण १०वर्ष झालेले नसल्याने त्यांचेवर प्रचंड अन्याय झालेला आहे. त्यामुळे त्यांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात करून त्यांनाही शासन सेवेत सामावून घेण्यात यावे अशी विनंती निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर यांच्याकडे कंत्राटी, तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
आपल्या मागण्या शासन स्तरावर पोहोचवून आपल्याला न्याय देण्यासाठी शासन स्तरावर नक्कीच पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी यावेळी निवेदकांना दिले.
यावेळी निवेदन देताना कू नंदेश्वर मॅडम, कु.बुरे मॅडम, कु. वासनिक मॅडम, सुरेश महाका, पी डी गावडे , वणेश मडावी, दिलीप वनकर, एच सी बैस, व्ही एच सोनजाल, एस के कुमरे, रुपसाय गोटा, तलेश मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.