दि. १४.०७.२०२३
Vidarbha News India
गडचिरोली : रोपवाटिकेत कर्मचारी झिंगले, दारु पिऊन झोपले; दोघांवर निलंबनाची कारवाई!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : रोपवाटिकेत करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कामकाजाच्या वेळेत मद्य प्राशन केले आणि झोपी गेले. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील मोहगाव रोपवाटिकेत हा धक्कादाय प्रकार घडला आहे.
या रोपवाटिकेत दारूपार्ट्या सतत सुरू असल्याची तक्रार होती. प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत मद्यधुंद कर्मचाऱ्यांना राहिले नाही. दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
नेमका काय प्रकार घडला?
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील बेडगाव वनपरिक्षेत्रातील मोहगाव रोपवाटिकेत कर्मचारी कामकाजाच्या वेळेत झिंगले. कार्यालयीन वेळेत रोपवाटिकेत कर्मचाऱ्यांनी दारू ढोसली. या रोपवाटिकेत सतत दारूपार्ट्या सुरू असल्याची तक्रार होती. परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत रोपवाटिका गाठली असता मद्यधुंद कर्मचाऱ्यांना कुठलेही भान राहिले नाही. वनविभागाने वायरल व्हिडीओच्या आधारे वनरक्षक वाघाडे व राऊंड ऑफिसर गहाणे या दोघांना निलंबित केले आहे.