दि. ३१.०७.२०२३
जिल्हा परिषदेच्या नव्याने रुजू मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांची आ. डॉ. देवरावजी होळी यांनी घेतली सदिच्छा भेट
- पुष्पगुच्छ देऊन केले जिल्ह्यामध्ये स्वागत...
- भेटीच्या प्रसंगी गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली भाषिक शिक्षक , पाणीपुरवठा योजना सोलरवर घेणे यासह केले विविध मुद्द्यांवर चर्चा...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये नव्यानेच रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयूषी सिंह यांची आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सदिच्छा भेट घेत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्यामध्ये स्वागत केले.
याप्रसंगी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासात्मक व समस्यात्मक बाबींवर चर्चा केली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये बंगाली भाषिक शिक्षकांची नियुक्ती करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतलेला असून त्या संदर्भात जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र काही कारणास्तव त्यांच्या नियुक्त्या थांबलेल्या आहेत. त्यावर तातडीने निर्णय घेऊन बंगाली भाषिक शिक्षकांना नियुक्ती दिल्यास बंगाली भाषिक विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीचे होईल. त्याचबरोबर कुनघाडा, तळोधी , नवेगाव नळ पाणीपुरवठा योजना वीज बिलामुळे अडचणीच्या ठरत आहेत. त्यामुळे या योजना सोलर वर घेऊन त्यातून मार्ग काढावा अशी सूचना त्यांनी याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली.