दि. ४ जुलै २०२३
Vidarbha News India
Gadchiroli Crime News:
गडचिरोली : एसआरपीफ जवनाकडून सहकाऱ्याचीच हत्या; कचरा टाकण्यावरून वाद.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : कचरा टाकण्यावरून झालेल्या वादातून राज्य राखीव बलाच्या जवानाने शेजारी राहणाऱ्या सहकाऱ्याची चाकू भोसकून हत्या केली. ही घटना (Gadchiroli) गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथील ( SRPF) राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ मुख्यालय परिसरात आज उघडकीस आली.
सुरेश मोतीलाल राठोड असे हत्या झालेल्या जवानाचे नाव असून आरोपी जवान मारोती सातपुते याला अटक करण्यात आली आहे. दोघेही जवान यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. विसोरा येथे राज्य राखीव बल गट क्रमांक १३ चे जिल्हा मुख्यालय आहे. या परिसरातील वसाहतीत सुरेश राठोड आणि मारोती सातपुते शेजारी वास्तव्यास होते. मागील काही दिवसांपासून दोघांच्याही कुटुंबात कचरा टाकण्यावरून आणि इतर कारणावरून वाद सुरू होते.
रात्रीच्या सुमारास वाद विकोपाला
दरम्यान सोमवारी रात्री ११ वाजताच्या (Crime News) सुमारास दोघांमधील वाद विकोपाला गेला. आरोपी मारोती याने घरातून चाकू आणून सुरेशवर वार केले. यात सुरेशचा मृत्यू झाला. याप्रकरणी देसाईगंज पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे.