दि. २०.०७.२०२३
जुनगांव नदीच्या पुलीयावरुन पाणी ओसरला, रहदारीचा मार्ग पुरवरत पूर्वरत सुरळीत...विदर्भ न्यूज इंडिया
चंद्रपूर/ प्रतिनिधी : पोभुर्णा : तालुक्यातील जुनगाव वैनगंगा उपनदीला गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने व सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदी फुगल्या जाऊन जुनगाव येथील पुलीया पाण्याखाली बुडला गेला होता, सतत चार दिवस पाणी ओसरला नसल्याने दोन नद्यांच्या संगमावर असलेला जुनगाव गाव कोंडीत सापडलेल्या स्थितीत होता पुलावरून पाणी चार ते पाच फुट वाहत असल्याने येथील रहदारीचा मार्ग पुर्णतः बंद होऊन गावाचा संपर्क इतर गावापासून तुटल्या गेला होता. परंतु आजतागायत पुलावरून पाणी ओसरला गेला असुन आता मार्ग सुरू झाल्याने जुनगाव वासीय जनतेला दिलासा मिळाला आहे.