मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीला मिळाली 'ही' महत्वाची खाती.! बघा सविस्तर... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीला मिळाली 'ही' महत्वाची खाती.! बघा सविस्तर...

दि. १४.०७.२०२३

Vidarbha News India

मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीला मिळाली 'ही' महत्वाची खाती.! बघा सविस्तर ...

विदर्भ न्यूज इंडिया

मुंबई : अखेर आज मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. राज्यपाल रमोश बैस यांच्या स्वाक्षरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेड यांच्या परवानगीने खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

या खातेवाटपामध्ये अनेक फेरबदल देखील कऱण्यात आले आहेत. तसेच भाजप आणि शिवसेनेकडून काही खाती काढण्यात आली. मात्र या सगळ्यात राष्ट्रवादी आणि खास उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलेली खाती सर्वांत महत्वाची ठरली आहेत.त्यामुळे अजित पवार यांचा बंड राष्ट्रवादी काँग्रेस साठी वाया गेले नसल्याचे दिसून येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन खाते देण्यात आले आहे. त्यामुळे राज्याची तिजोरी अजित पवार यांच्या हाती गेली आहे. बंड केल्यानंतर अजित पवार यांना कोणते खाते देण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता त्यांना अर्थ आणि नियोजन खाते देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण खाते वाटपात अजित पवार यांच्या गटाला मुख्य तीन खाती देण्यात आली आहेत. यामध्ये स्वता अजित पवार यांच्याकडे अर्थखाते, दिलीप वळसे पाटील यांना सहकार खाते आणि धनंजय मुंडेंना कृषी खाते मिळाले आहे.

कोणत्याही परिस्थितीत अजित पवार यांना अर्थखाते देऊ नये अशी शिंदे गटाची मागणी असल्याची चर्चा होती, याचे कारण म्हणजे महावीकस आघाडी सरकार मध्ये अर्थमंत्री राहिलेले अजितदादा निधी देत नव्हते असा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 नेत्यानी बंड केल होते. मात्र आता या सरकारमध्येही अजित पवार यांच्याकडेच तिजोरीच्या चाव्या राहिल्याने शिंदे गटातील आमदारांची खऱ्या अर्थाने गोची झाली आहे. चला पाहुयात राष्ट्रवादीच्या कोणत्या मंत्र्याला नेमक कोणत खाते मिळाले.

◆ अजित पवार- अर्थ खाते
◆ छगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक     संरक्षण
◆ दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील - सहकार
◆ अनिल पाटील - मदत आणि पुनर्वसन खाते
◆ धर्मराव अत्राम यांना अन्न आणि औषध प्रशासन
◆ हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
◆ अदिती सुनिल तटकरे - महिला व बालविकास
◆ संजय बनसोडे - क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
◆ धनंजय पंडितराव मुंडे - कृषि 

Share News

copylock

Post Top Ad

-->