अल्पसंख्याकांना मिळणार एक लाख रुपये.. वाचा सविस्तर बातमी... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

अल्पसंख्याकांना मिळणार एक लाख रुपये.. वाचा सविस्तर बातमी...

Vidarbha News India

अल्पसंख्याकांना मिळणार एक लाख रुपये.. वाचा सविस्तर बातमी...

Minorities one lakh

विदर्भ न्यूज इंडिया

तेलंगणा : तेलंगणातील विधानसभा आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केसीआर सरकारने अल्पसंख्याकांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी अल्पसंख्याकांसाठी 100 टक्के अनुदानासह एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

मात्र, या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत भाजपने याला तुष्टीकरणाचे नाव दिले आहे. तेलंगणा सरकारच्या म्हणण्यानुसार, अल्पसंख्याकांच्या प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही रक्कम कधीही परत करावी लागणार नाही. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शहरी भागात 2 लाख आणि ग्रामीण भागात 1.5 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारशी याचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय, वयोमर्यादा 2 जून 2023 रोजी 21 वर्षे ते 55 वर्षे दरम्यान असावी.

सध्या या योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद आणि एकूण लाभार्थींच्या संख्येसह राज्य सरकारवर पडणाऱ्या भाराचा हिशोब करणे बाकी आहे. राज्य सरकारमधील अल्पसंख्याक मंत्रालयाचे सचिव सय्यद उमास जलील यांच्या वतीने या घोषणा करण्यात आल्या आहेत. पात्रता आणि निकषांबाबत पूर्ण मार्गदर्शक तत्त्वेही लवकरच जारी केली जातील, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा सरकार टप्प्याटप्प्याने योजनेचा लाभ देणार आहे. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वांना मिळणे कठीण आहे. Minorities one lakh राज्यात 52 टक्के मागास जाती आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार, मुस्लिम 13 टक्के, ख्रिश्चन 1.27 टक्के, शीख आणि बौद्ध 0.09 टक्के आणि जैन 0.08 टक्के आहेत. केसीआर म्हणाले की, ही योजना लोकांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्याच्या दिशेने मैलाचा दगड ठरेल. ते म्हणाले की, अल्पसंख्याकांची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून तेलंगणा संपूर्ण देशासाठी एक उदाहरण आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार अल्पसंख्याकांसाठी ही योजना लागू करून गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे लोकांना नवीन नोकऱ्या आणि शिक्षणात मदत होईल, असे ते म्हणाले. गंगा जामुनी तहजीब टिकून राहावी यासाठी सरकार सर्व संस्कृती आणि परंपरांचे रक्षण करण्याचे काम करत आहे.


Share News

copylock

Post Top Ad

-->