दि. २५.०७.२०२३
विदर्भ आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाला संगणक भेट...
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर : महाराष्ट्र राज्यातील अतिदुर्गम भागात राहणारे विद्यार्थी विदर्भ आदिवासी वसतिगृह, लक्ष्मीनगर येथून आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत. ज्यांना आजच्या आधुनिक काळात संगणक काय आहे हे माहिती नाही, जेव्हा ही बाब भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष व व्ही. एन. रेड्डी रिसर्च अँण्ड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रेडी यांना कळताच त्यांनी विद्यार्थी वसतिगृहाला भेट देऊन त्यांना संगणक भेट दिले.
रेड्डी यांनी आजच्या युगात संगणकाचे महत्त्व समजावून सांगितले व खूप शिका व यशस्वी व्हा, असा मंत्र दिला. यावेळी वसतिगृह संचालक दिनेश शेराम, प्रियासिंग राजपूत, शिशुपाल आडे, राहुल शिरसाट, रोहित प्रधान, श्वेता रनदाई, अंकिता भुजाडे, अश्विनी कुलसुंगे व मनीष परतेकी प्रामुख्याने उपस्थित होते.