दि. २४.०८.२०२३
गोंडवाना विद्यापीठात प्रधानमंत्री राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान कार्यशाळा संपन्न
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : प्रधान मंत्री राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान मार्गदर्शन संबंधित गोंडवाना विद्यापीठाच्या अंतर्गत समाविष्ठ होणाऱ्या सर्व शासकीय व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांसाठी कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रूसा)चे सहसंचालक राहूल म्हात्रे ,अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, संचालक(प्र.) नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य डॉ. अनिल चिताडे, अधिष्ठाता मानवविज्ञान डॉ. चंद्रमौली हे व्यासपीठावर उपस्थित होते.
सहसंचालक राहूल म्हात्रे यांनी प्रत्यक्षात प्रधान मंत्री राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यामध्ये यापुर्वी २कोटी रुपये ही मर्यादा होती व आता ती वाढवून ५ कोटी रुपये करण्यात आलेली आहे. तसेच या अनुदानासाठी २०२३- २४ ते २०२५-२६ करीता १२५० कोटी निधीची तरतुद केलेली आहे व या योजनेचे अभ्यासक्रम, शिक्षण , प्रशिक्षण, पायाभूत सुविधा, मान्यता आणि रोजगार क्षमता सुधारणे व राज्य आणि
केंद्रशासित प्रदेशांमध्ये उच्च शिक्षणामध्ये समानता, प्रवेश, व उत्कृष्टता सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करणे हे महत्वाचे उद्दीष्ठ आहे असे ते म्हणाले. शासनाकडून गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील भागाला विशेष प्राध्यान्य देण्यात आलेले आहे. तरीही याचा जास्तीत जास्त कसा उपयोग करुन
घेता येईल याविषयी तपशीलवार उपस्थित सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्याना व त्यांच्या समन्वयंकाना मार्गदर्शन केले.
कुलगुरु डॉ. प्रंशात बोकारे यांनी अध्ययन व अध्यापन , संशोधन, अभ्यासक्रम तयार करणे आणि पायाभूत सोयी-सुविधांसाठी रूसा अंतर्गत मंजूर झालेला निधी कसा उपयोगी पडेल या विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार मॉडेल कॉलेज चे समन्वयक डॉ. संदीप लांजेवार यांनी केले.