दि. १५.०८.२०२३
गोंडवाना विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते पार पडला.
भारतीयांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन स्वातंत्र्य खेचून आणले. त्यांच्या मुळेच आपण हे स्वातंत्र उपभोगत आहोत.याचा उपयोग विधायक कार्यासाठी आपण करायला हवाय. गेल्या ७५ वर्षांमध्ये भारताच्या प्रगतीचा आलेख जर आपण पाहिला तर तो इतर देशांच्या तुलनेत खूप पुढे आहे. येत्या काळात भारत जगात सर्वोच्च स्थानी राहील आणि याचा फायदा येणाऱ्या पिढीला होईल असे मनोगत कुलगुरु यांनी व्यक्त केले.
त्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन,अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. अनिल चिताडे,अधिष्ठाता मानव विज्ञान डॉ. चंद्रमौली यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विद्यापीठातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि संविधानिक अधिकारी, अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.