दि. १२.०८.२०२३
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाशी आ. डॉ. देवरावजी होळी यांची भेट, चर्चा व मागणी...
- अनुसूचित जातीतील मांग, मादगी, मातंग, खाटीक या सारख्या जातींच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करा.
- दिल्ली येथे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी भेट घेत केली मागणी.
- आयोगाचे सदस्य सप्टेंबर महिन्याच्या कालावधीमध्ये गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर...
- अनुसूचित जातीतील मांग, मादगी ,मातंग, खाटीक या सारख्या जाती अजूनही अविकसित.
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : अनुसूचित जातीमधील मांग, मादगी, मातंग, खाटीक, यासारख्या अनेक जाती अजूनही विकासापासून दूर असून त्या मागासलेल्याच राहिलेल्या आहेत. त्यामुळे या जातींच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता असून त्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने पुढाकार घ्यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी दिल्ली येथे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन केली.
यावेळी त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर व सदस्य सुभाष पारधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या जातीतील लोकांचा विकास अजूनही इतरांप्रमाणे झालेला नाही. अजूनही हा समाज मोठ्या प्रमाणावर मागासलेलाच आहे. त्यामुळे या समाजाच्या विकासासाठी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असून त्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने पुढाकार घ्यावा अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाषजी पारधी सप्टेंबर महिन्याच्या कालावधीमध्ये गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यात दौऱ्यावर येणार असून त्या कालावधीमध्ये या जातींच्या लोकांच्या भेटी घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली आहे.